महेंद्र दळवी यांचे सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन- शिवसेना अलिबाग तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. त्यानंतर आयोजीत शिवसैनिकांच्‍या मेळाव्यात बोलताना माजी जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी आपल्‍या भाषणात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे व शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्‍यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या देशभरात महिलांनी मीटू मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणासंदर्भात केलेल्या आरोपांमुळे बॉलिवुड, राजकारण व माध्यमांसह सर्वच क्षेत्रांना हादरे बसत आहेत. महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता रायगड जिल्ह्यात या मीटूची जोरदार चर्चा सुरू आहे.

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्‍या उपस्थितीत झालेल्या शिवसनेच्या या कार्यक्रमात बोलताना महेंद्र दळवी म्हणाले की,  सध्‍या संपुर्ण देशात मी टू ची मोहीम विशेष गाजत आहे. या दोघांच्‍या विरोधात एक जरी महिला पुढे आली तर हजारो महिला समोर येतील. या दोघांना लाजलज्‍जा उरलेली नाही, असे खळबळजनक वक्तव्य दळवी यांनी केले.

तर केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, सुनील तटकरे व जयंत पाटील कशासाठी एकत्र आले आहेत ते सर्वांना मा‍हीत झाले आहे. जिल्ह्यातील जनता त्‍यांना चांगलच ओळखून आहे. गीते हे निष्‍क्रीय मंत्री आहेत त्‍यांनी काय काम केलं असं तटकरे विचारत फिरत आहेत. त्‍यांना हिशोब द्यायला मी बांधील नाही. मी माझ्या मतदार संघातील मतदारांना बांधील आहे. अलिबाग तालुक्‍यातील राष्‍टड्ढवादी संपली असून, तटकरेंना चहा प्‍यायला आता घरसुद्धा शिल्‍लक राहिलेले नाही. तीच अवस्‍था आता शेकापची होईल आणि अलिबाग विधानसभा मतदार संघावर भगवा फडकेल असा विश्‍वास गीता यांनी व्‍यक्‍त केला.

अहमदनगर : पारनेर तालुक्यात भीषण अपघात ; ८ जण जागीच ठार

अलिबागच्‍या शिवसेनेतील जुने नवे वाद संपले असून सर्वजण एकदिलाने यावेळी एकत्र येऊन विरोधकांची दाणादाण उडवतील असा विश्वास त्यांनी गिते यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणूकीत सेना-भाजपची युती होणार नाही. आणि युती झाली नाही तर भाजपला स्‍वतंत्र उमेदवार उभा करावा लागेल. त्‍यावेळी भाजपवाले शेकापच्‍या नेत्‍यांना खिशात घालतील आणि मग शेकाप नेते सुनील तटकरेंना दूर सारतील, असे राजकीय भाकीत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले.