Mahendra Singh Dhoni CSK Captain | महेंद्र सिंह धोनीच्या गळ्यात पुन्हा कर्णधारपदाची माळ, जडेजाचा तडकाफडकी राजीनामा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयपीएलमधील (Tata IPL 2022) चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या कर्णधारपदाचा रविंद्र जडेजाने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धोनीच्याच (Mahendra Singh Dhoni CSK Captain) हातात सीएसकेच्या कर्णधारपदाची (Mahendra Singh Dhoni CSK Captain) सूत्र जाणार आहेत. सीएसकेने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.

 

आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी रविंद्र जडेजाने कर्णधारपद (Captaincy) सोडण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच त्याने एम. एस. धोनीला सीएसकेचं नेतृत्व करण्याची विनंती केली असून धोनीनेही कर्णधारपद स्वीकारलं आहे. धोनी आता पुन्हा एकदा मैदानावर कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

यंदाचा सीझन चालू होण्याआधी माहीने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
त्यावेळी सीएसकेने जडेजाची कर्णधारपदी निवड केली होती. मात्र जडेजाच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईच्या संघाने चमकदार कामगिरी केली नाही.
सीएसकेने आत्तापर्यंत 8 सामने खेळले आहेत मात्र यामधील दोन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला आहे.

 

दरम्यान, धोनीच्या नेतृत्त्वामध्ये चेन्नईच्या संघाने चारवेळी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.
रोहित शर्मानंतर (Rohir Sharma) धोनी हा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
आता जडेजाच्या राजीनाम्यानंतर धोनीच्या नेतृत्तवामध्ये चेन्नईचा संघ कमबॅक करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Mahendra Singh Dhoni CSK Captain | Tata ipl 2022 ravindra jadeja step down as captiancy mahendra dhoni take over charge

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rashmika Mandanna Oops Moment | हात वर करताच जे नको तेच दिसलं, रश्मिका मंदान्ना झाली Oops Moment ची शिकार…

 

Uddhav Thackeray on Raj Thackeray | ‘राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत’; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका!

 

Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांची निवड