‘माही’च्या चाहत्यांसाठी खुशखबर ! MS धोनीच्या ‘कमबॅक’ची तारीख ठरली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक चर्चांनंतर आता पक्की माहिती आहे की भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा क्रिकेट मैदानावर उतरणार आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम येत्या 29 मार्चपासून सुरु होतोय. यासाठी धोनी लवकरच सराव सुरु करणार आहे, चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्याची वाट पाहत आहेत.

धोनीने गेल्या वर्षी 10 जुलैला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅनचेस्टरमध्ये वर्ल्ड कप सामनात न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनलनंतर धोनी मैदानातच उतरला नाही. गेले काही महिने त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु आहे. अनेकांनी तर त्याच्या क्रिकेट न खेळण्याबद्दल देखील शंका उपस्थित केली होती. धोनी देखील त्यांच्या भविष्यातील योजनासंबंधित स्वत: किंवा बीसीसीआयमार्फत काहीही बोलला नाही.

परंतु आयपीएलमध्ये धोनी खेळणार हे आधीच निश्चित झाले होते. या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील स्थान ठरणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात निवृत्तीसंदर्भात प्रश्नावर धोनीने जानेवारीपर्यंत मला काहीही विचारु नका असे म्हटले होते.

गेल्या सात महिन्यात धोनी फक्त एकदाच नेटमध्ये सराव करताना दिसला आहे. रांचीमध्ये झारखंड रणजी संघासोबत त्याने सराव केला होता. सरावावेळी देखील धोनीने त्याचा जुना फॉर्म दाखवला होता.

काय आहे प्लॅन –
धोनी 29 फेब्रुवारीला चेन्नईत दाखल होणार आहे. 1 मार्चपासून तो संघासोबत सरावाला सुरुवात करेल. सरावासाठी 24 पैकी 15 ते 16 खेळाडू असतील. अन्य खेळाडू मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात येतील. आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला चेन्नई विरुद्ध मुंबई असा रंगणार आहे. त्याआधी चेन्नईच्या खेळाडूंसोबत 3 ते 4 सराव सामने होतील. हे सामने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहेत.

You might also like