आगामी 48 तासात महेंद्रसिंह धोनी निवृत्‍तीचा निर्णय घेणार ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ संपल्यानंतर आता भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठीची संघाची निवड १९ जुलैला होईल. परंतू महेंद्र सिंह धोनी बाबत लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. असे सांगण्यात येत आहे की वेस्टइंडिज दौऱ्या आधीच धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. पुढील ४८ तासात धोनी आणि सिलेक्टर्स यांच्यात धोनीच्या संन्यासाबाबात चर्चा होऊ शकते. असे असेल तरी याची अजूनही आधिकृत महिती आलेली नाही.

मानले जात आहे की वेस्टइंडिज दौऱ्यात धोनीचे सिलेक्शन करण्यात येणार नाही. या दरम्यान सिलेक्टर्स त्यांच्याशी क्रिकेटमधील संन्यासाबाबत चर्चा करण्यात येईल. महेंद्र सिंह धोनी यांच्यावर नीट खेळत नसल्याची टीका करण्यात येत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रानुसार पूर्ण वर्ल्ड कपमध्ये धोनीने सावकाश फलंदाजी केल्याने मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद लवकरच त्याच्याशी चर्चा करणार आहे. ते म्हणाले की जर धोनीने स्वत:च संन्यास घेतला नाही तरी टीममध्ये त्यांना घेण्यात येणार नाही. त्यांनी यातून संकेत दिलेत की धोनीला संघात सामावून घेण्याची योजना नाही.

भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा –
भारताचा वेस्टइंडिज दौरा ३ ऑगस्टला सुरु होणार आहे. ज्यात ३ टी२०, तीन वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. दौऱ्यांची सुरुवात टी २० पासून होणार आहे. त्यानंतर वनडे सीरीज ८ ऑगस्टला होईल. २२ ऑगस्टला पहिली टेस्ट खेळवण्यात येईल. दुसरी टेस्ट ३० ऑगस्टला असेल. या दौऱ्यांसाठी संघाची निवड १९ जुलैला होणार आहे. शिखर धवन देखील खेळणे अवघड आहे. त्याजागी मयंक अग्रवाल याला संघात खेळण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने