महेश बाबूनं पुरग्रस्तांसाठी सीएम रिलीफ फंडात जमा केली ‘इतकी’ रक्कम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तेलगू सुपसस्टार महेश बाबूने ((Mahesh Babu) पावसामुळे प्रभावित (helped-families-affected-heavy-rains) झालेल्या लोकांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. महेश बाबूने तेलंगणा सीएम फंडामध्ये 1 कोटीचा निधी जमा केला आहे. याची माहिती स्वत: त्याने ट्विट करून दिली आहे. तसेच त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी समोर याव, असे आवाहन केले आहे. यापूर्वीही महेश बाबूने कोरोना (Coronavirus) महामारीच्या दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सीएम रिलीफ फंडात त्यांनी 1 कोटी रुपयांची मदत जमा केली होती.

महेश बाबूने ट्विट करत म्हणले आहे की, तेलंगणाच्या सीएम रिलीफ फंडासाठी मी 1 कोटी रुपये (contributed-1-crore-telangana-cm-relief-fund) दिले आहेत. माजी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, समोर येऊन तुम्ही मदत करावी. या कठीण काळात आपल्या लोकांसोबत उभे रहा. मी सर्वांना विनंती करतो की, जे समोर येऊ शकतात. त्यांनी सढळ हस्ते दान कराव. या मदतीने बदल होईल. दरम्यान महेश बाबू सोबतच साऊथमधील लोकप्रिय कलाकार अल्लु अर्जुन, पवन कल्याण, रजनीकांत आदीनीही सीएम रिलीफ फंडात मदत जमा केली आहे. दरम्यान साऊथमधील विविध भागाला पूराचा तडाखा बसला आहे. अशात लोकांना मदत करण्याच आवाहन केल जात आहे.

महेश बाबू आता त्याच्या आगामी सरकरू वेरी पाटा या चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री किर्ती सुरेश दिसणार आहे. परशुराम या सिनेमाच दिग्दर्शन करणार आहेत.