२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील ‘या’ रिअल लाईफ हिरोवर महेश बाबू  बनवणार चित्रपट 

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १० वर्ष उलटून गेली . तरी या हल्ल्याचा थरार आजही कायम आहे. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले. तसेच १४ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली. या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची शौर्यगाथा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे.

मेजर संदीप उन्नीकृष्णन हे राष्ट्रीय सुरक्षा पथकामध्ये (एनएसजी) कमांडो म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. त्यांचा जीवनप्रवास या बायोपिकद्वारे दाखवण्यात येणार आहे.‘मेजर’ असे या बायोपिकचे नाव असून साऊथ सुपरस्टार महेश बाबूची जीएमबी इन्टरटेंन्मेंट निर्मिती संस्थेमध्ये या बायोपिकची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.अभिनेता अदिवी सेश हा या चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे. अदिवी सेश यापूर्वी ‘बाहुबली’ चित्रपटात झळकला होता.

महेश बाबूने ट्विट करत या चित्रपटाविषयी सांगितले.या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण टिक्का करणार आहेत.महेश बाबूसोबतच या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे.या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरु होणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.