मृत्यूवरील ‘त्या’ ट्विटमुळे महेश भट्ट ‘ट्रोल’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील काही जण चर्चेत आले असून त्यामध्ये दिग्दर्शक महेश भट्ट यांचा समावेश झाला आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे अनेकदा नाव जोडले होते. सुशांतच्या नैराश्याविषयी समजताच तू त्याच्यासोबत राहू नको असा सल्ला महेश भट्ट यांनी रियाला दिल्याचा बोलले जात आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनाही ट्रोल केले जात आहे. महेश भट्ट ट्विटर, इन्स्टाग्रामवर अनेकदा स्वत:चे विचार मांडत असतात. मात्र आता त्यांचे हेच विचार ट्रोलिंगचे शिकार ठरतायत. नुकतेच त्यांनी मृत्यूसंदर्भात काही ट्विट केले, ज्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

‘आयुष्य आपल्याला फक्त या दोनच गोष्टी देऊ शकते. ते म्हणजे जीवन आणि मृत्यू’, असे ट्विट त्यांनी केले आहे. याआधीच्या ट्विटमध्ये त्यांनी ‘मृत्यूच्या शय्येवर असलेली माणसे खूप विनोदी गोष्टींचा विचार करतो. आणि त्यामुळेच आपण सर्व इथे आहोत, नाहीत का? मृत्यूच्या शय्येवर असलेली माणसं.’ या ट्विटसोबतच त्यांनी हाडांच्या सापळ्याचा फोटो पोस्ट केला होता.

मृत्यूसंदर्भातील या ट्विट्समुळे दिग्दर्शक महेश भट्ट सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरूनही त्यांच्या पोस्टवरून कमेंट्स केले जात आहेत. अनेकांनी महेश भट्ट यांच्या चित्रपटांनाही बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी महेश भट्ट फक्त नकारात्मकच विचार करू शकतात असे म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.