‘नागरिकत्व’ सिध्द करण्यासाठी कागदपत्र जमा करणार नाही, CAA च्या वादावर महेश भट्ट यांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फिल्म मेकर महेश भट नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAB)वर आधरीत राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (NRC)मध्ये आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दस्तऐवज जमा करणार नाहीत. स्वराज इंडियाचे संस्थापक आणि अ‍ॅक्टीविस्ट योगेंद्र यादव यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत महेश भट भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचाताना दिसत आहेत.

योगेंद्र यांनी व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटलं, “धन्यवाद महेश भट. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात राष्ट्रीय मोहिम सुरु करण्यासाठी धन्यवाद.”

महेश भट यांनी रविवारी सकाळी मुंबईमध्ये राजगृहवर CAB विरोधात ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला होता. राजगृह ते ठिकाण आहे जिथे कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर रहात होते. या कार्यक्रमात भारताच्या संविधानाची प्रस्तावनाही वाचण्यात आली.

‘लोकशाहीला वाचवण्यासाठी नेहमी पुढे यायला हवं’

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना महेश भट म्हणाले, “जेव्हा कधी लोकशाही धोक्यात असेल तिला वाचवण्यासाठी नेहमी पुढे यायला हवं. आम्ही यासाठीच इथे आहोत. माझी आई म्हणाली होती की, जेव्हा घरात आग लावते तेव्हा सर्वात प्रिय वस्तू उचलून पळायला हवं. मुलं सर्वात प्रेमळ असतात.” जेव्हा महेश यांना विधेयकाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, “जर लोकांच्या लक्षात येत नसेल तर विधेयक कशा प्रकारे नुकसानदायक नाही हे समजावून सांगणं हे सरकारचं काम आहे.”

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/