महेश भट यांचे ‘ते’ ट्विट होत आहे व्हायरल ; नेटिझन्स कडून कमेंट्सचा पाऊस

मी औरंगजेबाला जवळ घेऊ शकत नाही, अशोक पंडित यांचे रिट्विट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकांमुळे देशभर सध्या इलेक्शन फिवर आहे मग यात बॉलिवूडकर कसे मागे राहतील ? बॉलिवूडकरांच्या ट्विटर अकाउंटवर देखील ट्विट, रिट्विटचा सामना पाहायला मिळतो आहे. आता महेश भट यांनी केलेल्या ट्विटवर नेटकरी कमेंट्स आणि रिट्वीटचा पाऊस पाडत आहेत. भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी संबंधित हे ट्विट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

काय आहे महेश भट यांचे ट्विट

आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखेच प्रेम करा,’ हेच ते महेश भट यांनी केलेले ट्विट. महेश भट यांनी एका व्हिडीओसोबत हे ट्विट पोस्ट केले आणि सध्याच्या राजकीय धुराड्यात या ट्विटवर जोरात चर्चा सुरु झाली. बॉलिवूडचे निर्माते अशोक पंडित यांना महेश भट यांचे हे ट्विटजराही रूचले नाही. मग काय, त्यांनी थेट त्यावर प्रतिक्रिया नोंदवली. ‘मी औरंगजेबाला प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही,’ असे त्यांनी लिहिले.

काय आहे अशोक पंडित यांचे ट्विट

सर, आम्ही अनेक वर्षांपासून हेच करण्याचा प्रयत्न करतोय. पण याबदल्यात आम्हाला मृत्यू, बलात्कार आणि बळजबरीने घर सोडावे लागले. दहशतवादाने बरबटलेल्या शेजाऱ्यावर कुणी कसे प्रेम करू शकते ? जो आमच्या जिवावर उठलाय, त्याच्यावर कसे प्रेम केले जाऊ शकते ? केवळ शेजारी आहात म्हणून तुम्ही प्रेमास पात्र ठरत नाही. मी औरंगजेबाला जवळ घेऊ शकत नाही, असे अशोक पंडित यांनी लिहिले. अशोक पंडित यांनी अलीकडे आलेला ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्र्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे.

https://twitter.com/ashokepandit/status/1110918142249877505