Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Mahesh Landge | चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक (Chinchwad Bypoll) जाहीर झाली आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून ही निवडणुक लढवावी, अशी इच्छा विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपकडून (BJP) ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी भाजपकडून पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे महेश लांडगे हे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. निवडणुक बिनविरोध व्हावी या आशयाचे पत्रदेखील यावेळी ते त्या-त्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना देत आहेत.

 

आपल्या पत्रात आमदार महेश लांडगे यांनी लिहिले आहे की, ‘अशा दुःखाच्या काळात आपण सर्वांनी जगताप कुटुंबियांसोबत रहायला पाहिजे. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून लक्ष्मण भाऊंनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. हे आपल्या कुणालाच विसरता येणार नाही. त्यामुळे जगताप यांनी कळत नकळत केलेल्या मदतीची परतफेड करण्याची हीच ती वेळ असून प्रत्येकाने आपल्या सद्विवेकबुध्दीने विचार करून जगताप कुटुंबातील उमेदवाराविरोधात आपला उमेदवार देऊ नये.’ असे आवाहन आपल्या पत्राच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक विरोधकांना केले आहे.

यासंबंधीचे पत्र महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane),
काँग्रेस पक्षाचे कैलास कदम (Kailas Kadam), शिवसेनेते अॅड. सचिन भोसले (Adv. Sachin Bhosale)
आणि मनसेचे सचिन चिखले (Sachin Chikhale) यांना दिले आहे. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर (Balasaheb Walhekar),
रिपाइंचे शहराध्यक्ष स्वप्निल कांबळे (Swapnil Kamble), भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे (Amit Gorkhe) आदी नेते यावेळी उपस्थित होते.

 

Web Title :- Mahesh Landge | mla mahesh landge emotional appeal to the opposition on the by election pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल

Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत

Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल