पोलीसनामा ऑनलाइन टीम : दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण पन्हाळा गडावरील सज्जाकोटी येथे सुरू असतानाच तटबंदीवरून 19 वर्षे तरुण 100 फूट खाली कोसळल्याने दुर्घटना घडली आहे. सध्या हा तरुण गंभीर जखमी असून त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Mahesh Manjrekar)
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून पन्हाळा गडावर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या दरम्यानच 19 वर्षीय नागेश खोबरे हा पन्हाळा गडावरील सज्जाकोटी येथे तटबंदीवर चित्रीकरण सुरू असताना त्याचा तोल जाऊन तो 100 फूट खाली कोसळला. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गडावर घोडे आणण्यात आले होते. यांच्या देखभालीची जबाबदारी नागेश कडे होती. यावेळी सज्जा कोटीच्या उत्तर बाजूच्या तटबंदीवर मोबाईल फोनवरून संभाषण संपवून तो पुन्हा परतत असताना त्याचा तोल जाऊन तो तटबंदी वरून थेट शंभर फूट खाली कोसळला. ही घटना उपस्थितांच्या लक्षात येताच त्यांनी खोल दरीत दोरी टाकून दोरीच्या सहाय्याने खाली उतरत नागेशला वर आणले. यावेळी नागेशच्या डोक्याला व छातीला गंभीर इजा झाली होती. त्याला तातडीने कोल्हापुर येथील सी.पी. आर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नागेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सी.पी. आर रुग्णालयातून कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Mahesh Manjrekar)
या घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली.
मात्र यावेळी सदर घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचे उघडकीस आले.
तर जखमीला उचलून वर आणताना एका तरुणाने व्हिडिओ काढल्यामुळे त्यालाही मारहाण करण्यात आली.
याआधी देखील चित्रपटाची घोषणा होताच या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिका आणि त्यांच्या वेशभूषेवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
त्यानंतर पुन्हा या घटनेमुळे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू राहणार की थांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Web Title :- Mahesh Manjrekar | a young man fell 100 feet down while shooting of mahesh manjekars movie at panhala fort
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | ‘ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम’, भास्कर जाधवांचा टोला
Maharashtra Farmers March | मागण्या मान्य झाल्याने लाँग मार्चमधील शेतकरी वासिंद मधून परत निघाले