सिद्धार्थ जाधवच्या ‘दे धक्का’चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ११ वर्षापुर्वी सगळ्यांना खळखळून हसविणारा चित्रपट ज्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आज ही तो चित्रपट चाहते तितक्याच उत्सुकतेने पाहतात. या चित्रपटाविषयी एक आनंदाची बातमी चाहत्यांना भेटणार आहे. ‘दे धक्का’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. पहिल्या ‘दे धक्का’ चित्रपटाने १० कोटींची कमाई केली होती. आता याचा सिक्वेल कसा असेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. सिक्वेल येणार असल्याचे चाहत्यांना कळताच ते खूप आनंदी होणार आहे. कॉमेडी चित्रपट पाहण्यास प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतता. या चित्रपटाचा सिक्वल तितकाच दमदार असेल यात शंकाच नाही.

नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाले आहे. या पोस्टरमध्ये ‘वेलकम टू लंडन’ असा बोर्ड हातात घेऊन एक महिला उभी राहिलेली दिसत आहे. पोस्टर पाहून असे वाटते की, या चित्रपटाचे आणि लंडनचे काहीतरी कनेक्शन असेल. या चित्रपटाचे पोस्टर पाहून चाहत्यांना त्यांची कथा जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. त्यांची उत्सुकता लवकरच संपणार आहे कारण हा चित्रपट ३ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
image.png
मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार ‘दे धक्का २’ मध्येही असणार आहेत. यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहणे मनोरंजक ठरणार आहे. यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार असणार आहे हे मात्र गुपीत आहे. ३ जानेवारीला ‘दे धक्का २’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटाचा निर्माता अमेय खोपकर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –