लाच लुचपत प्रतिबंध विभाग, ठाणे च्या अधिक्षकपदी महेश पाटील

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी असलेले डॉ. महेश पाटील यांची बदली झाली असून, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.

पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक, उप महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. या बदल्यांमुळे राज्यात मोठे बदल झाले आहेत. गेली दोन महिन्यांपासून वरिष्ठ, अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले होते. दोन महिन्यापासून आज होतील उद्या होतील असे चालू होते. मात्र कोणत्यातरी कारणामुळे बदल्या काही होत नव्हत्या. अखेर शुक्रवारी (दि.२७) रोजी राज्यातील १२० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यामध्ये पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या ९५,  उप महानिरीक्षक दर्जाच्या १९ आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत.
[amazon_link asins=’B079DQ27LV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df9ff14e-9275-11e8-9060-ad4e09312413′]

डॉ. महेश पाटील हे पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ तीनच्या उपायुक्तपदी होते. त्यावेळी त्यांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. समाजाला डोकेदुखी ठरणाऱ्यांचा बंदोबस्त केला होता. व्हाईट कॉलर गुन्हेगारांवर चाप लावला होता. त्यांनी खाकी नोकरीच्या पलीकडे जाऊन कुष्ठरोगी वसाहतीमधील नागरिकांना कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या, व्यवसाय सुरू करून दिले. मुंबई शहरामध्येही डॉ. पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

ठाणे ग्रामीणचे अधीक्षक असताना पोलीस खात्यामध्ये चांगली शिस्त लावली. स्वतः १८ तास बसून काम करायचे आणि करुन घ्यायची त्यांची पध्दत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहून ठाणे ग्रामीणमध्ये काम करून घेतले. डॉ. महेश पाटील यांची लाच लुचपत प्रतिबंध विभाग ठाणे येथे बदली झाली आहे.