माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध, 15 जणांची 5 वर्षांसाठी विश्वस्त म्हणून निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनची 2020-25 ची पंचवार्षीक निवडणूक आज पार पडली. संस्थेचे अध्यक्ष धनराज मालचंद राठी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजीत करण्यात आली होती. सर्वसाधारण सभेनंतर निवडणूकीची प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीमध्ये पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

maheshwari charitable foundation

आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज संस्थेचे सचिव संजय चांडक यांनी पाहिले. विशेष सर्वसाधारण सभेनंतर उपस्थित सभासदांमधून हिरालाल मालू, पुरुषोत्तम लोहिया, गिरधर काळे, राम बांगड, जवाहर बाहेती, पुनमचंद धूत, डॉ.रामबिलास मंत्री यांची निवड समिती स्थापन करण्यात आली.

या समितीने राजेंद्र भट्टड, राजेश राठी, सुनील सोमानी, आनंद माहेश्वरी, मंदनलाल भुतडा, घनशाम लाहोटी, बालाप्रसाद बजाज, श्रीप्रकाश बागडी, भंवर पुंगलीया, उमेश झंवर, विजयराज मुंदडा, शाम कलंत्री, ईश्वर धूत, अशोक राठी, संतोष लढ्ढा यांची पाच वर्षासाठी विश्वस्त म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ॲड.मनोहर माहेश्वरी यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले. निवड समिती अध्यक्ष हिरालाल मालू, पूनमचंद धूत यांनी एक मताने वरील पदाधिकाऱ्यांची निवड केली. संस्थेचे अध्यक्ष धनराज राठी यांनी निवड झालेल्या विश्वस्तांचे अभिनदंन केले.

या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष धनराज मालचंद राठी यांनी निवृत्ती जाहीर केली. यावेळी धनराज राठी यांचा उपस्थितांच्या हस्ते आणि नव्याने निवडण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाचा सत्कार करण्यात आला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like