अभिनेत्री माही गिलचा ‘त्या’ लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल ‘धक्‍कादायक’ गौप्यस्फोट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच झालेल्या फिक्सर नावाच्या वेब सीरीजच्या सेटवरील हल्ल्याने चर्चेत आलेल्या अभिनेत्री माही गिलने मोठा खुलासा केला आहे. आपल्या आगामी सिनेमाचे प्रेमोशन करताना तिने मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिला एक मुलगी देखील आहे. इतकेच नाही तर तिने तिच्या रिलेशनबद्दलही वक्तव्य केलं आहे.

‘मला अडीच वर्षांची मुलगी आहे’

माही गिल सिंगल नाही असं तिने एका मुलाखतीत उघड केलं आहे. ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते. मुलाखतीत माही म्हणाली की, “माझी अडीच वर्षांची मुलगी आहे. तिने नाव विरोनिका आहे.” परंत तिने हा खुलासा नाही केला की, तिने ही मुलगी अ‍ॅडॉप्ट केली आहे की तिला जन्म दिला आहे.

‘मी लिव्ह इनमध्ये राहते’

एका मुलाखतीत माही गिलने आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. माही म्हणाली की, “मी अविवाहित आहे. परंतु माझा एक बॉयफ्रेंड आहे. माही म्हणाली आम्ही लवकच लग्न करणार आहोत. परंतु लग्न करण्यामुळे किंवा न करण्यामुळे आमच्या नात्याला काही फरक पडत नाही. मला स्वातंत्र्य आणि स्पेस दोन्हीही हवं आहे. आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. हो आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. लवकरच लग्नही करणार आहोत.”

माहीविषयी थोडक्यात…

43 वर्षीय माही गिलने 2003 मध्ये अमितोज मानचा सिनेमा हवाएं मध्ये काम करून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. खोया खोया चांद मुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या माहीला ‘साहब, बीवी और गैंगस्टर’ या सिनेमांमुळे लिस्टर अभिनेत्रींमध्ये जागा मिळाली आणि या फ्रेंचाईजीच्या तिनही सिनेमात तिने काम केले. लिडपेक्षा हटके भूमिक साकारण्याच्या खासियतने माही गिलने हिंदी सिनेमात आपली वेगळी जागा तयार केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !