खुशखबर ! सर्वसामान्यांसाठी ‘ही’ कंपनी बाजारात आणणार ३ ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलेक्ट्रिक कारसाठी सरकारने अनेक प्रकारे प्रोत्साहन दिल्यानंतर आता ऑटोमोबाईल कंपन्यासुद्धा अशा प्रकारच्या गाड्या बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. अनुदान, स्वस्त कर्ज, चार्जिंग सुविधा इत्यादी उपाययोजना करून सरकार इलेक्ट्रिक कार च्या वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठीचा GST चा दर देखील १२ टक्क्यांहून ५ टक्क्यांवर आणत आपला अजेंडा सरकारने अर्थसंकल्पातून स्पष्ट केला होता. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढणार आहे.

त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने यावर फोकस करत ही कंपनी सर्वसामान्यांसाठी भारतात लवकरच ३ नवीन कार लॉन्च करणार असून यांची किंमतही सर्वसामान्यांना परवडेल इतकी स्वस्त असणार आहे. कंपनीने आपल्या तिमाही धोरणात हि बाब स्पष्ट केली. यावेळी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका यांनी या ३ कारची घोषणा केली आहे.

सध्या बाजारात असणाऱ्या KUV100 या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन eKUV100 या नावाने लाँच करण्यात येणार आहे. यासाठी कंपनी पुढील तीन वर्षात एकूण १८००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा कंपनीची सध्या भारतीय बाजारात कंपनी ई-व्हर्टिओ ही इलेक्ट्रिक कार असून तिची विक्रीदेखील चांगली होत आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन ३ कार्स यावर्षीच्या अखेरपर्यंत लॉन्च करण्यात येतील अशी माहिती गोयंका यांनी दिली. तसेच २०२१ पर्यंत या कार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त