मोठ्या डिस्काउंटसह मिळतेय Mahindra ची ‘ही’ सर्वात सुरक्षित 8 सीटर कार, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मोठ्या कुटुंबांना मोठ्या कारची आवश्यकता असते. आपण आपल्या मोठ्या कुटुंबासाठी एक मोठी 8 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असणारी देशातील सर्वात सुरक्षित एमपीव्हींपैकी एक महिंद्रा मॅराझो (Mahindra Marazzo) बद्दल सांगणार आहोत. 8 सीट साठी सर्वोत्कृष्ट या एमपीव्हीमध्ये उत्तम फीचर्स आहेत. येथे आम्ही आपल्याला या एमपीव्हीची फीचर्स, स्पेशिफिकेशन, डायमेन्शन आणि डिस्काउंट बद्दल माहिती देत आहोत.

ऑफर आणि किंमत:

ऑफरच्या बाबतीत महिंद्रा मॅराझोच्या खरेदीवर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर 41,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत. किंमतीबद्दल बघितले तर महिंद्रा मॅराझोची आरंभिक एक्स-शोरूम किंमत 11,25,136 रुपये आहे.

पॉवर आणि स्पेसिफिकेशन:

पॉवर आणि स्पेसिफिकेशनच्या बाबतीत बघितले तर महिंद्रा मॅराझोमध्ये 1497cc इंजिन आहे जे 3500 Rpm वर 121 Hp ची पॉवर आणि 1750-2500 Rpm वर 300 Nm चा टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्सच्या बाबतीत मॅराझो 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

डायमेन्शन, ब्रेकिंग सिस्टम आणि सस्पेंशन:

डायमेन्शनच्या बाबतीत बघितले तर मॅराझोची लांबी 4585 mm, रुंदी 1866 mm, उंची 1774 mm, व्हीलबेस 2760 mm आणि इंधन टाकीची क्षमता 45 लिटर आहे. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बघितले तर मॅराझोच्या पुढच्या आणि मागील भागात डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच सस्पेंशन बद्दल बघितले तर मॅराझोच्या पुढच्या बाजूला डबल विशबॉन सस्पेंशन आहे आणि मागील बाजूस एक ट्विस्ट बीम सस्पेंशन देण्यात आले आहे.

फीचर्स आणि कलर ऑप्शन्स:

फीचर्सबद्दल बघितले तर मॅराझोमध्ये एबीएस, एअरबॅग्स, चारही चाकांना डिस्क ब्रेक, ईबीडी, ISOFIX सह चाइल्ड सीट माउंट्स, कर्निंग लॅम्प्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, मागील पार्किंग सेन्सर आणि साइड इफेक्ट बीम्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कलर ऑप्शनबद्दल बघितले तर Mariner Maroon, Iceberg White, Aqua Marine, Shimmering Silver आणि Oceanic Black कलरमध्ये उपलब्ध आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like