तलाकच्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान ! जाणून घ्या ‘कौन है वह’ ?

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानी अ‍ॅक्ट्रेस माहिरा खान हिला लग्नाच्या 5 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा प्रेम झालं आहे. माहिराचं नाव बिजनेसमन सलीम करीम सोबत दीर्घकाळापासून जोडलं जात आहे. अखेर माहिरानं यावर भाष्य केलं आहे. पाकिस्तानातील फेमस फॅशन डिझायनर हसन शहरयार यासीन म्हणजेच HSY सोबत सोशल मीडियावरील लाईव्ह संवादात तिनं याबद्दल सागितलं होतं.

https://www.instagram.com/p/CAng87GBncT/

‘हो, मला तो आवडतो’
HSY नं माहिराला  तिला प्रश्न केला आणि सलीम करीमचं नाव घेतलं. तेव्हा माहिरा लाजली. HSY नं विचारलं सलीमला पाहिल्यांतर सर्वात आधी मनात काय विचार येतो. यावर बोलताना माहिरानं तिची मालिका हमसफरची आठवण काढली. माहिरा म्हणाली, “जर तुम्ही विचारत असाल की, मला सलीम आवडतो का. तर मी सांगेन हो, मला तो आवडतो. मला त्याला  पाहिल्यानंतर असं  वाटतं की, मी आयुष्यात काहीतरी चांगलं केलं असेल म्हणून मला तो भेटला आहे.”  यावेळी तिनं तिच्याच हमसफर या मालिकेतील एक संवाद बोलून दाखवला. जो सर्वांना खूप आडवला.

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790189330792448?s=20

कोण आहे सलीम करीम ?
सलीमबद्दल बोलायचं झालं तर तो एक बिजनेसमन आहे. तो Simpaisa नावाचं स्टार्टअप चालवतो. 2017 साली अशा अफवा समोर आल्या होत्या की, दोघांनी टर्कीमध्ये साखरपुडा केला आहे. परंतु अद्याप मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790349003689993?s=20

फ्रेंडच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले ‘माहिरा-सलीम’
सलीम बिजनेसमन तर आहेच सोबत तो एक DJ देखील आहे. 2017 साली सलीम आणि माहिरा Tapmad TV लाँच करताना दिसले होते. याशिवाय माहिरा तिच्या एका फ्रेंडच्या लग्नातही सलीमसोबत आली होती.

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790226886533120?s=20

माहिराच्या पहिल्या लग्नाबद्दल…
माहिराचं याआधी एक लग्न झालं आहे. 2007 साली तिनं अली असकरीसोबत लग्न केलं होतं. 2015 मध्ये त्यांचा तलाक झाला. माहिराला अलीपासून एक मुलगाही आहे. त्याचं नाव अजलान आहे.

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790426594181127?s=20

सोशलवर सक्रिय असते माहिरा
माहिरा सोशलवर कायमच सक्रिय असते. इंस्टावरून जगभरातील चाहत्यांसोबत संपर्कात आहे. अलीकडेच माहिरानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला होता ज्यामुळं ती अचानक चर्चेत आली होती.

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790281899102210?s=20

माहिराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं पाकमधील अनेक टीव्ही शो आणि सिनेमात काम केलं आहे. माहिरा खान पाकिस्तानी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील मोठं नााव आहे. हमसफर या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली.  शाहरुख खानच्या रईस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर भारतात पाकच्या कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली.

https://www.instagram.com/p/B8yMFoDBGKv/

https://twitter.com/TimePassSpeaks/status/1279790386194665477?s=20

https://www.instagram.com/p/B8WLOWkB_SR/

https://www.instagram.com/p/B6Pz2QfBGOd/

https://www.instagram.com/p/B20PtOUBm38/

https://www.instagram.com/p/B0dQGrDhm5z/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like