संपूर्ण देशात ‘NRC’ व्हावे, किती ‘घुसखोर’ आहेत हे कळेल : ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे सरचिटणीस महमूद मदनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जमीयत उलेमा-ए-हिंदचे जनरल सेक्रेटरी महमूद मदनी यांनी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) संबंधित मोठे विधान केले आहे. मदनी म्हणाले, मला वाटते की देशभरात NRC केली पाहिजे, याने कळेल की आपल्या देशात किती घुसखोर आहेत. गुरुवारी दिल्लीत झालेल्या जमायत उलेमा-ए-हिंद च्या बैठकीत ते बोलत होते.

महमूद मदनी यांना प्रश्न विचारण्यात आला की, सरकार जर संपूर्ण देशात एनआरसीचा निर्णय घेईल तर काय होईल? यावर उत्तर देताना मदनी म्हणाले, मला वाटते की संपूर्ण भारतात करु द्या एनआरसी, कळेल तरी आपल्या देशात किती घुसखोर आहेत. जे खरे आहेत त्यांच्यावर देखील डाग लावला जातो, त्यामुळे कळेल की नेमकी काय परिस्थिती आहे, मला काहीही समस्या नाही.

काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे जमीयत उलेमा – ए – हिंदने म्हणले आहे. दिल्लीत झालेल्या उलेमा- ए-हिंदने एक प्रस्ताव पास केला. त्यात ते म्हणाले की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व काश्मीरी आमचे भाऊबंध आहेत. कोणत्याही फुटीरतावाद्यांचे आंदोलन ना की फक्त देशासाठी तर काश्मीरसाठी देखील धोकादायक आहे.

काश्मीर आमचा होता, आमचा आहे, आमचाच राहिलं –

मदनी म्हणाले की, काश्मीर आमचा होता, आमचा आहे, आमचा राहिलं. आम्ही देशाच्या सुरक्षेबाबात, देशाच्या अखंडत्वाबाबत कोणतीही जोखीम घेऊ शकत नाही. ते म्हणाले की बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. भारत आमचा देश आहे. आम्ही देशासाठी कायम तयार आहेत. पाकिस्तान राष्ट्रीय स्तरावर खोटे पसरवत आहे की, भारतीय मुस्लिम आपल्याच देशाच्या विरोधात आहे, आम्ही याचा विरोध करतो.

आरोग्यविषयक वृत्त –