पोलिस कर्मचार्‍याचा खून करणार्‍याला कोल्हापूरमध्ये अटक

सांगली: पोलीसनामा ऑनलाईन

जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांचा सपासप 18 वार करून खून करणार्‍या मुख्य संशयितास कोल्हापूरच्या राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. झाकीर जमादार असे अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, मांटे खून प्रकरणातील दोन संशयितांना बुधवारी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली होती.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’731babaf-8b14-11e8-af21-0fd26b2118ab’]

सांगलीतील कुपवाड रस्त्यावरील रत्ना डिलक्स हॉटेलमध्ये दारूच्या बिलावरून मंगळवारी रात्री मांटे आणि संशयितांमध्ये वाद झाला होता. मांटे यांचा मंगळवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास झाकीर जमादार आणि त्याच्या साथीदारांनी सपासप वार करून खून केला होता. पोलिस कर्मचार्‍याचा खून झाल्याने सांगली जिल्हा पोलिस दलासह राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली होती. मांटे याचा खून करणारे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवुन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. सांगलीच्या एलसीबीने राजू नदाफ आणि अन्सार पठाण यांना बुधवारी अटक केली. मुख्य संशयित झाकिर जमादार हा फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोध घेत होते. कोल्हापूर मधील राजावाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे आणि त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा झाकिर जमादार याला कोल्हापूरमध्ये अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली असून त्याला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

पोलिस कर्मचारी समाधान मांटे यांचा पोलिस गणवेशात खून करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांच्या भावना तीव्र झाल्या होता. आता मांटे यांचा खून केल्यानंतर झाकिरला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा अधिक तपास सांगली पोलिस करीत आहेत.

सपासप १८ वार करून पोलिस कर्मचाऱ्याचा अमानुष खून