पोलीस भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती घोटाळा प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यात वकिलांना भेटण्यासाठी आला असताना त्याला गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने सापळा रचून अटक केली.

प्रविण दत्तात्रय भटकर ( वय ३४, रा. मराठा मंदिराजवळ, बावधान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रविण भटकर हा पुण्यासह नांदेड व हिंगोली येथील पोलीस भरती प्रक्रियेतील पोलीस भरती प्रक्रिया घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहे. भरती प्रक्रिया घोटाळाप्रकरणी यापूर्वी एसआरपीएफ मधील दोन कर्मचारी आणि ओएमआर शीट तपासणी करणारे दोन आरोपी असे चौघांना अटक केली आहे. त्यासोबतच पोलिसांनी यापुर्वी पोलिसांनी तेजस राजेंद्र नेमाडे (वय २३, रा. उमेद अपार्टमेंट, लगड मळा, सिंहगड रोड, मूळ रा. कारंजा रोड, ता. मूर्तिजापूर) याला अटक केली होती.

वकिलाला भेटण्यासाठी आलेला असताना अटक
या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी प्रविण भटकर हा आहे. तो मागील एक वर्षापासून फरार होता. पुण्यात तो त्याच्या वकिलांना भेटण्यासाठी पुण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर केले तेव्हा त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ मध्ये १२ मार्च २०१८ ते २१ एप्रिल २०१८ दरम्यान पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत राज्य राखीव पोलीस दलातील काही पोलीस व भरती प्रक्रियेतील उत्तरपत्रिका तपासणी करण्याचे टेंडर दिलेल्या कंत्राटदार कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला होता. त्यांनी निवड प्रक्रियेतील लेखी परीक्षेत उत्तर पुत्रिकेत फेरफार करून बनावटीकरण करून गुण वाढविले होते. त्यानंतर याप्रकरणी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक निरीक्षक भालचंद्र ढवळे, संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक शेंडगे, कर्मचारी अजय जाधव, संतोष मोहिते, संदिप सुर्वे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, समीर शेख, राजाभाऊ भोरडे, केरबा गलांडे, संजय देशमुख, अमजद पठाण, महेश साळवी, सचिन घोलप, प्रमोद घाडगे, दया शेगर, प्रमोद गायकवाड, अंकुश जोगदंडे, महेश वाघमारे, प्रविण काळभोर, महिला पोलीस शिपाई स्नेहल जाधव व कर्मचारी संजयकुमार दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा