आनंत माने खुन प्रकरणातील मुख्य आरोपी  गजाआड 

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन
इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथील आनंत सोपान माने या युवकाचा १ ऑक्टोबर रोजी व्याजाचे पैशातून मुख्य आरोपी खाजगी सावकार सोमनाथ भिमराव जळक व शिवराज कांतीलाल हेगडे यांनी संगनमताने खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह विहिरीत टाकून फरार झाले होते. त्यापैकी एक आरोपी शिवराज हेगडे याला संशयावरून इंदापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. तर दुसरा मुख्य आरोपी फरार होता. तब्बल बारा दिवस पोलीसांना हुलकावण्या देत होता. अखेर शुक्रवार (दि.१२) मुख्य आरोपी सावकार सोमनाथ जळक याला बेड्या ठोकण्यात इंदापूर पोलिसांना यश आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a5347e4-ceea-11e8-bbef-8701184a9940′]

मुख्य आरोपी सोमनाथ जळक याने त्याचा मित्र शिवराज हेगडे याच्या मध्यस्थिने अनंता माने (रा. गोतोंडी. ता. इंदापूर, जि. पूणे) याला व्याजाने रोख रक्कम दीली होती. खासगी व्याजाने दिलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून सावकार सोमनाथ जळक व शिवराज हेगडे यांनी अनंता माने  याचे अपहरण करून १ ऑक्टोबर रोजी दगडाने ठेचुन खुन केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह व त्याच्या डोक्यात घातलेला दगड निमगाव केतकी हद्दीतील  विहीरीत टाकुन दिला होता. घटना घडल्यानंतर तीसर्‍या दिवशी मयत अनंत माने याचा मृतदेह पाण्यात फुगून वर आल्याने हे प्रकरण उघडकीस आले होते.
 

बलात्कार प्रकरणातील आरोपीला मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

त्या वेळी मयत आनंत माने याचा मृतदेह नातेवाईकांनी ओळखल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी विहीरीच्या जवळच असलेल्या इंदापूर बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून जोपर्यंत आरोपिला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमाका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे इंदापूर बारामती रस्ता दोन तास रोखुन धरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तर पोलिसांना अतिरिक्त पोलिस कुमक मागवावी लागली होती व परीस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती.

त्यावेळी बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व इंदापूर पोलिस निरिक्षक मधूकर पवार यांनी मयत आनंता माने याचे नातेवाईकाशी सविस्तर चर्चा करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले होते. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी इंदापूर उपजील्हा रूग्णालयात हलविण्यात आला होता.

दिघीतून चार गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

अगोदरच्या दिवशी  शिवराज कांतीलाल हेगडे यांने सावकार सोमनाथ जळक व त्याच्या साथीदार दोन महीला यांच्या विरोधात इंदापूर पोलिस स्टेशनला  मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली होती. हाच धागा सहाय्यक पोलिस निरिक्षक राम गोमारे यांनी पकडून या प्रकरणातील संशयाची सुई शिवराज हेगडे याचेकडे वळली. राम गोमारे यांनी क्षणाचाही विलंब न लावता संशयीत शिवराज हेगडे याला ताब्यात घेतले. व त्याला विश्वासात घेवुन त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत विचारणा केली. परंतु त्याने तपासात योग्य सहकार्य केले नाही.तसेच पोलिसांचीच दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. शेवटी बारामती पोलिस उपविभागीय अधिकिरी नारायण शिरगावकर यांचे आदेशान्वये व पोलिस निरिक्षक मधुकर पवार नेतृत्वाखाली शिवराजची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान मयत आनंता माने याचा खुन मी व माझा मित्र सावकार सोमनाथ जळक आम्ही दोघांनी संगनमताने व्याजाचे मुद्दल रक्कम व व्याज न दिल्याने आनता माने याचा खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या डोक्यात मारलेला दगड व त्याचा  मृतदेह निमगाव केतकीजवळील विहीरीत टाकुन दिल्याचे सांगीतले.

[amazon_link asins=’B01M0JSAFU,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5be3596a-ceec-11e8-b825-854d11be24d1′]

ज्या दिवशी संध्याकाळी घटना घडली त्या दिवशीपासुन खासगी सावकार व या प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ भिमराव जळक (वय २९ रा. तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पूणे) हा फरार झाला होता. गुन्हा उघडकीस येवुन आरोपी निष्पन्न झाल्यानंतर सोमनाथ जळक हा पोलीसांना वारंवार गुंगारा देवुन ठीकाणे बदलून वास्तव्य करत होता. इंदापुर पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर होती. परंतु तो  पोलिसांना सापडत नव्हता. अखेर शुक्रवारी (दि. १२) सोमनाथ जळक त्याच्या खासगी कामानिमित्त इंदापुरात येणार असल्याची खबर सहाय्यक पोलिस निरिक्षक राम गोमारे यांना गुप्त खबर्‍या मार्फत मिळाली. त्यानुसार बारामती पोलिस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांचे आदेशान्वये, इंदापूर पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राम गोमारे व त्यांचे सहकारी पथकाने सापळा लावुन सावकार व मुख्य आरोपी सोमनाथ जळक याला अखेर बेड्या ठोकण्यात यश मिळविले. ही कारवाईत  पोलीस कॉन्स्टेबल मोहीते, पोलीस हावलदार शंकर वाघमारे, पोलीस नाईक संजय जाधव, जगदीश चौधरि, बापू मोहीते, राहूल बडे यांनी केली.

[amazon_link asins=’B00DRLASZ6,B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9222d481-ceec-11e8-bebd-97c4392f0449′]