राज ठाकरेंना धक्का ; ‘हा’ प्रमुख कार्यकर्ता करणार भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक हृषीकेश जोशी भाजपात जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्जत नगरपरिषदेत राष्ट्रवादी आघाडीस पाठिंबा देऊ नये हे म्हणणं पक्षाने ऐकलं नसल्याचं कारण देत मनसे सोडण्याचा निर्णय घेतल्याचे हृषीकेश जोशी यांनी म्हटले आहे.

वयाच्या १६व्या वर्षापासून राज ठाकरे यांचे कार्यकर्ता असलेला हृषीकेश जोशी भाजपात जाणार आहेत. त्याबाबत हृषीकेश जोशी म्हणाले की ,’कर्जत नगरपरिषद राष्ट्रवादी आघाडीस पाठिंबा देऊ नये असे पक्षाला विनवले असताना देखील पक्षाने ऐकले नाही त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं हृषीकेश जोशी याने म्हटले आहे. तसेच निवडणुकीत आपल्याला घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची स्थानिक नेतृत्वाची ऑफर होती व तसच वैयक्तिक लढायची विनंती करून देखील मी लढलो नाही. परंतु पक्षानं आपलं ऐकलं नाही.’पक्षाने आपल्याला नेहमीच मदत केली असल्यामुळे मी मनसेचा आभारी असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

हृषीकेश जोशींचा राजकीय प्रवास –

हृषीकेश जोशी हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा पहिला मुंबई विद्यापीठ अध्यक्ष पदाचा उमेदवार होता. तसेच त्याने मनसेच्या अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, कळवा अशा हजारोंच्या सभेत जोशी याने भाषण केले असून विद्यार्थी संघटनेसाठी सुमारे १०० हुन अधिक आंदोलनं केली आहेत.

रत्नागिरीत राज ठाकरेंसोबत वयाच्या विसाव्या वर्षी अटक झालेला सर्वात कमी वयाचा आरोपी अशी त्याची ओळख आहे. हृषीकेश जोशी हा व्यवसायाने वकिल असून सनद घेण्याआधी त्याने सुमारे ६ वर्ष रत्नागिरीला केस साठी आरोपी म्हणून फेऱ्या मारल्या होत्या.

वाह रे शासन तेरा खेल जब न्याय मांगा तब मिली जेल : छगन भुजबळ
शक्ती मिल रेप Case : सरकारच असंवेदनशील, कोर्ट काय करणार ? : हायकोर्ट
तेव्हा मोदींना मिठी मारावीशी वाटते : राहुल गांधी