शेतकरी, छोटे व्यापाऱ्यांना पेन्शन यासह भाजपचे ‘हे’ आहेत संकल्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने आपला जाहिरनामा आज प्रसिद्ध केला आहे. देशातील ६ कोटी जनतेच्या सहभागातून हा जाहीरनामा तयार केला असल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी या जाहीरनाम्यातील ७५ संकल्प जनतेसमोर सादर केले. शेतकरी, व्यापारी आणि सामान्यांना खुष करण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, यांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचे प्रकाशन केले. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी यातील मुद्दे मांडले आहेत.

राजनाथ सिंह यांनी सांगितलेले काही ठळक मुद्दे

– १ लाखाच्या कृषी कर्जावर ५ वर्षे ० टक्के व्याजदर असेल

– सिटीजनशिप विधेयक लागू करणार

– ग्रामीण भागासाठी ७५ लाख करोड

– किसान सन्मान योजना दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये, तर ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शन देणार

– राष्ट्रीय व्यापारी आयोगाची निर्मिती करणार

– छोटया दुकानदारांनाही पेन्शनचा लाभ

– उत्कृष्ट शिक्षण संस्थांतील व्यवस्थापन, विधी आणि वैद्यकिश शिक्षणासाठी जागा वाढविणार

– पावर फॉर ऑल सर्व घरात १०० टक्के विद्यूतीकरण, सर्व घरात एलपीजी

– बहुतेक रेल्वे मार्ग ब्रॉड गेज, तसेच विद्यूतीकरण पुर्ण करणार

– राष्ट्रीय महामार्ग दुप्पट करणार

– स्वच्छ भारतच्या माध्यमातून १०० टक्के वेस्ट मॅनेजमेंट करणार

– राम मंदिरासाठी सर्व शक्यतांचा विचार

– ७५ नवे मेडीकल कॉलेज, पीजीचे विद्यापीठ

– निर्यात दुप्पट करण्याचे ध्येय

– गरीबासाठी आरोग्य़ सेवा – सर्व रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधात

– डॉक्टरांचे प्रमाण एकास १४०० करण्याचे लक्ष

– दर ५ किमीला बँक उपलब्ध करण्याचे लक्ष

– सरकारी कार्यालयांचे डिजीटलायजेशन

– असंघटित कामगारांना पेन्शन, विमा

– राष्ट्रीय संग्रहालयांचे डिजीटायजेशन

– ६ आदीवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या संग्रहालयाची निर्मिती

– दहशतवादाविरोधात ० टॉलरन्स पॉलिसी

भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा LIVE….