अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचे ‘ही’ 6 प्रमुख कारणे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात मंदी येणार असल्याच्या जोरदार चर्चांनी जोर धरला आहे. क्रिसिल या पतमानांकन संस्थेने देखील भारताचा आर्थिक विकास दर हा ६. ९ इतकाच राहणार असल्याचे भाकीत वर्तवल्याने आले आहे. त्याचबरोबर हा अहवाल सादर करताना या संस्थेने या मंदीची कारणे देखील सांगितली आहेत.

हि आहेत प्रमुख कारणे

१) आर्थिक सुधारणेच्या नावाखाली धक्के
भारतात झालेल्या नोटबंदीमुळे नागरिकांना मोठा झटका बसला होता. यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती कमी झाली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढल्याने देशातील वस्तूंची मागणी देखील कमी झाली.

२) महागाईमुळे घेतलेल्या निर्णयांचा उलटा परिणाम
महागाई वाढल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उलटाच परिणाम दिसून आला. महागाई वाढल्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक नाड्या आवळल्या. मात्र या निर्णयाने आर्थिक विकास दर वाढण्याऐवजी तो कमीच होत गेला.

३) अमेरिका चीन व्यापारयुद्ध
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध वाढल्यामुळे याचा परिणाम जगभरात झाल्यामुळे गुंतवणूक करण्यास कंपन्या विचार करा असत. याचा फटका भारताला देखील बसल्यामुळे जागतिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे.

४) कच्चे तेल झाले महाग
जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे देखील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर तेलाचे भाव कमी झाल्यानंतर देखील सरकारने तेलांवरील कर कमी न केल्याने तेलाचे भाव अव्वाच्या सव्वा वाढल्याने याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.

५)बुडीत बँका
काँग्रेस सरकारच्या दुसऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर बँकांचे कर्ज घेऊन बुडविण्यात आले. त्यानंतर भाजपच्या कालखंडात देखील हेच सुरु राहिल्याने मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाल्याने भारतीय बँकांची स्थिती फार बिकट झाली.

६) गरीब शेतकरी
खाद्यपदार्थांबरोबरच मागील काही वर्षांत अन्य वस्तूंच्या भावात देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा खिसा रिकामा राहत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस गरीब आणि कर्जबाजारी होत आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये मध्ये जीएसटी लागू करण्याचा घेतलेला निर्णय देखील याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे देखील दिसून आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त