वाढत्या वयातही सुंदर दिसायचंय ? ‘या’ 5 सोप्या गोष्टी प्रत्येकानं करायलाच हव्यात ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   वाढत्या वयात अनेकदा कुटुंब आणि जबाबदारीमुळं स्कीन आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळं तुम्ही अधिक वयस्कर दिसता. यासाठी आपण 5 उपाय जाणून घेणार आहोत. वाढत्या वयात या 5 गोष्टी करायलाच हव्यात.

1) फेस क्लीन्जरचा वापर – वयाच्या तिशीनंतर 6-7 वर्षे त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. असं केल्यास फरकही दिसू लागतो. अशात सुंदर त्वचेसाठी क्लीन्जर वापरा. तुम्ही सॉफ्ट क्लीन्जरही वापरू शकता.

2) मॉईश्चरायजरचा वापर – त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉईश्चरायजरचा वापर करा. सी जीवनसत्व असलेल्या तेलाचा वापर जास्त फायदेशीर ठरतो. ऑलिव्ह ऑईलनं जर चेहऱ्याची मसाज केली तर फरक दिसून येतो.

3) काळे डाग – वाढत्या वयात ही समस्या जास्त जाणवते. यासाठी उन्हात जाताना सनस्क्रीन लावा. तुम्ही लोशनचा वापरही करू शकता. याशिवाय इतर काही घरगुती उपाय करूनही काळे डाग घालवता येतात.

4) फेसमास्क – याचा वापर कोणत्याही वयात करता येतो. यामुळं त्वचा चमकदार होते.

5) व्यायाम – तिशीनंतर हाडं आणि स्नायू मजबूत राहणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही व्यायाम करायला हवा. यामुळं शरीर मजबूत आणि निरोगी राहतं.