1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम ! आता गाडी चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, RC जवळ बाळगण्याची गरज नाही

पोलिसनामा ऑनलाईन – मोटार वाहन नियमातील बदलांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट यासारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही. केंद्र सरकारने मोटर वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने मोटर वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल आहेत. त्यानुसार, 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जातील. 1 ऑक्टोबरपासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहितीची वाहतूक विभागाकडे साठवली जाणार आहे. यासाठी डिजीटल कागदपत्रांची आरटीओकडून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असेल. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो, परंतु हा केवळ मार्ग शोधण्यासाठी, नेव्हिगेशनसाठीच असावा. तसेच, यावेळी वाहन चालवताना लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी. चालकांनी दिलेल्या नेव्हिगेशनसाठी मोबाईलचा वापर कसा करायचा याची नियमावलीही मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन गाडीच्या डॅशबोर्डला लावणे बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होणार नाही. मोबाईल फोन हातात घेऊन नेव्हिगेशनसाठी वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.