हाच तर नाही ना रसिका सुनिलच्या आयुष्यातला खरा गॅरी ? ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

लॉस एंजिलिस : पोलीसनामा ऑनलाईन – माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. तिचा बोल्ड लूक, मालिकेतील मस्तीखोर पण प्रेमळ स्वभाव, अभिनय यामुळे चाहते तिच्या प्रेमात आहेत. तसेच रसिका सुनीलच्या (Rasika Sunil) खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडते. नुकतेच रसिकाने नव-वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. पण तिने नुकतेच लॉंंस एंजिलिसमध्ये काढलेले 2 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.रसिकाच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिच्यावर नव-वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

रसिका सुनीलने आपल्या इन्स्टाग्रामवर आदित्य बिलागीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन दिले आहे, ‘2000 किस. तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या खूप शुभेच्छा. 2020 मध्ये बऱ्याच वाईट घटना घडल्या पण त्या वर्षाने मला कृतज्ञ राहण्यासाठी अनेक कारणे ही दिली आहेत, या पोस्टमधील रसिका आणि आदित्यची केमिस्ट्री बघून चाहत्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

पोस्टर गर्ल या मराठी चित्रपटातून तिने अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. अभिनेत्री रसिका सुनीलने भरतनाट्यमचं शिक्षण घेतले आहे. तसेच तिला बुलेट चालवायलाही आवडते. रसिकाने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे.