Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे महसूल विभाग सर्वोत्तम; पुणे जिल्ह्याला विविध गटातून एकूण 8 पुरस्कार प्राप्त

पोलीसनामा ऑनलाईन – Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत उच्चतम कामगिरी बद्दल पुणे महसूल विभाग (Pune Revenue Department) राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटातून एकूण ८ पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले. यामध्ये अमृत गट (राज्यस्तर) अंतर्गत १० लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात राज्यस्तरावर पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) पहिला क्रमांकाचा आणि पुणे महानगरपालिकेला Pune Municipal Corporation (PMC) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. याच गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला जाहीर झाला. (Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards)

नगर परिषद व नगर पंचायत गट अंतर्गत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यस्तरावर लोणावळा नगर परिषदेला (Lonavala Nagar Parishad) दुसऱ्या क्रमांकाचा आणि बारामती नगर परिषदेला (Baramati Nagar Parishad) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. या गटात भूमी थिमॅटिक मधील उच्चतम कामगिरीचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेला जाहीर झाला. याच गटात विभागस्तर पुरस्कार अंतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला (Talegaon Dabhade Nagar Parishad) पुरस्कार जाहीर झाला. १५ ते १५ हजार लोकसंख्या गटात माळेगाव बु. (ता. बारामती) या नगर पंचायतीला (Malegaon Budruk Nagar Panchayat) राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.

या अभियानात पुणे महसूली विभाग राज्यस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारा पहिला क्रमांकाचा विभाग ठरला आहे.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी
यांना जाहीर झाला आहे.

Web Title :   Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | Pune Revenue Department Best Under My Vasundhara Abhiyan 3.0; Pune district received a total of 8 awards from various groups

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | विनोद तावडेंकडून एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खडसे म्हणाले…

Shirur Lok Sabha | शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीमधील वाद मिटला?, विलास लांडे म्हणाले-‘अमोल कोल्हे यांना…’

72 Hoorain Teaser Release | लव जिहादचे रहस्य उलघडून सांगणारा आणखी एक चित्रपट ‘72 हुरैन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला