‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला ‘मेकओव्हर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होते. ही शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील हिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सोशल मीडियावर सक्रिय असून ती त्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफबद्दल अपडेट देत असते.

ती सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे आणि ती पायलट झाली आहे. रसिकाने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. रसिकाने केस कापले असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. “तू छोट्या केसांमध्ये अधिक सुंदर दिसतेस” असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. रसिकाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून १७ तासांत ३३ हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे जाहीर केले होते. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते.