Major Accident in Jalgaon | दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक; भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Major Accident in Jalgaon | जळगाव जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना (Major Accident in Jalgaon ) समोर आली आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून (Tanker) दुसर्‍या टँकरमध्ये दूध (Milk Tanker) टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ 4 ते 5 वाहनांनी टँकरला धडक दिली. ही घटना मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील घोडसगाव जवळ आज (शुक्रवारी) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. या झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू (5 Died on The Spot) झाला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू होते. यासाठी 1 क्रेनही बोलावण्यात आली होती. त्यावेळी अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक (Truck) त्या पाठोपाठ 2 कार अशा 4 ते 5 भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला जोरात धडक दिली. यामध्ये टँकरमधील 3, धुळ्यावरून आलेला मालक आणि आणखी 1 अशा 5 जणांचा मृत्यू झाला आहे. (Major Accident in Jalgaon)

दरम्यान, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात (Muktainagar Sub-District Hospital) पाठविण्यात आले.
दरम्यान अद्यापपर्यंत मृत्तांची नावे समोर आली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती समजताच घोडसगाव येथील पोलीस पाटील (Police Patil)
आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना (Police) मदत केली.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.

 

Web Title :- Major Accident in Jalgaon | milk tanker and truck collied each other 5 people died on the spot in jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mukul Madhav Foundation | फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे पालघरच्या आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम

 

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

 

Model Found Dead | 21 वर्षांची प्रसिद्ध मॉडल-अभिनेत्रीचा वाढदिवशी झाला मृत्यू, सुसाईड की मर्डर?