तटरक्षक दलाची मोठी कारवाई ! 8 पाकिस्तानी खलाशांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त

कच्छ : वृत्तसंस्था –   भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने कच्छ येथे अरबी समुद्राला लागून असलेल्या भारतीय सागरी सीमेवर एक जबरदस्त कामगिरी केली आहे. तटरक्षक दलाने अंमली पदार्थ भारतात तस्करीसाठी आणणारी एक पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. त्यात 8 पाकिस्तानी खलाशी होते, त्यांच्याकडून 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे.

अधिकृत माहितीनुसार, जप्त केलेली ही बोट कच्छ जिल्ह्यातील जाखू बीचजवळ पकडली गेली आहे. भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी खलाशी आणि हिरोईनविषयी माहिती दिली आहे. आयटीजीने ट्विटरवर म्हटले आहे की, गुजरात दहशतवादी पथकाबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत आयसीजीने भारतीय समुद्री क्षेत्रातील आयएमबीएल (आंतरराष्ट्रीय मेरीटाइम बॉर्डर लाइन) जवळ पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. या बोटीत आठ पाकिस्तानी खलाशी आणि 30 किलो हेरॉईन होते. या बोटीसह 8 पाकिस्तानी खलाशांना ताब्यात घेतल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली आहे.