भंडारा रुग्णालय अग्निकांड प्रकरणी सव्हिल सर्जन सह 5 जण निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भंडारा जिल्हा सामान्य (Bhandara Hospital fire) रुग्णालयातील नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात झालेल्या अग्निकांडामध्ये 10 नवजात बालकांचा होपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत संबधित रुग्णालयातील डॉक्टर आणि दोन परिचारकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 8 जानेवारी) रोजी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हादरला होता. या अग्निकांडाप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत होती. या प्रकरणाची चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने सिव्हिल सर्जनसह दोन परिचारिका आणि इतर दोन कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला होता. त्यानंतर आता आरोग्य विभागाने या प्रकरणी मोठी कारवाई करताना संबंधित रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता बडे यांना निलंबित केले आहे. तसेच त्याशिवाय अन्य तीन कर्मचाऱ्यांनाही निलंबित कले आहे. यासंदर्भातील वृत्त एका मराठी वृत्तवाहिनी दिली आहे.

भंडारा अग्निकांड प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत केली होती. समितीने आपला 50 पानी अहवाल तयार केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे रुग्णालयात आग लागल्याचे यात नमूद केले आहे. शॉर्ट सर्किटमुळे एका बॉडी वार्मरमध्ये आग लागली होती. त्यानंतर काही वेळाने आउटबॉर्न विभागात आग पसरली, असे अहवालात स्पष्ट केले आहे. इन्क्युबेटरच्या वार्षिक तपासणीसाठी एम.कॉम. पास कर्मचारी नेमण्याचे दिव्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. परिणामी इन्क्युबेटरच्या स्फोटामुळे दहा नवजात बालकांचा बळी गेला, अशी धक्कादायक माहिती तपासणी अहवालातून पुढे आली आहे.