पाकिस्तानला महागात पडलं शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत 3 सैनिक ठार, चार चौक्या उध्वस्त

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तान (Pakistan) कडून करण्यात आलेल्या सीझफायरच्या उल्लंघनाच्या (Ceasefire Violation) उत्तरात भारतीय सैन्या ( indian army) ने रविवारी पाकिस्तानी लष्कराला चोख प्रत्युत्तर दिले. काश्मिरातील राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याला प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्याने ( indian army) 3 पाकिस्तानी सैनिक ठार केले आहेत, तर अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या चार चौक्या देखील नष्ट करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानच्या सैन्याकडून एलओसीवरील सीझफायरच्या उल्लंघनात नौशेरा सेक्टरला सतत लक्ष्य केले जात होते. पाकिस्तानकडून होणार्‍या हल्ल्याला उत्तर देताना भारतीय सैनिकांनी आज मोठी कारवाई केली, त्यात 3 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. यावेळी अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले.

रविवारी पाकिस्तानकडून घुसखोरीचे मोठे षडयंत्र रचण्यात येत होते. भारतीय सैनिकांनी पाहिले की राजौरीच्या नौशेरा सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील कालसिया भागातील सीमेच्या पलीकडून दहशतवाद्यांचा एक गट येत होता, ज्याला पाकिस्तानी सैन्य कव्हर फायर देत होते. दहशतवादी भारतीय सीमेवर घुसण्याच्या प्रयत्नात होते, ज्यांना भारतीय सैन्याने अयशस्वी ठरवले आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, सध्या या भागात फायरिंग बंद आहे.

पाकिस्तानने 4 हजाराहून अधिक वेळा सीझफायरचे उल्लंघन केले

पाकिस्तानच्या सैन्याने तर दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी सीझफायर उल्लंघनाचे गेल्या 17 वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. 28 डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास पाकिस्तानने संपूर्ण एलओसीवर 4700 वेळा सीझफायरचे उल्लंघन केले आणि या उल्लंघनासाठी पाकिस्तानने लहान शस्त्रे तसेच मोठ्या तोफांचा वापर करून नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांना लक्ष्य केले.