मोठी बातमी : ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या नियमांमध्ये मोठे बदल, ‘यांच्या’ DL मध्ये अजिबात बदल नाही

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन – ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात राजस्थान उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने अशिक्षीत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स न देण्याचा आदेश दिलना आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय खंडपीठाने आदेश दिले आहेत की, अशिक्षीत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स देवु नका. अशिक्षीत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स देणे हे धोकादायक ठरू शकते कारण त्यांना रस्त्यावरील दिशादर्शक फलक आणि इतर साइन बोर्ड वाचता येत नाहीत तसेच त्यांना सिग्‍नलच्या सुचना देखील समजत नाहीत.

दीपक सिंह यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये अशिक्षीत नागरिकांना जड वाहन चालविण्याचा परवाना HMV (ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका रद्द बातल केली आहे. नागरिकांसाठी मोटार व्हीकल नियम आहेत. अशिक्षीत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स दिले तर त्यांना मानवी सुरक्षेसाठी रस्त्यावरील लावण्यात आलेले दिशा दर्शक फलक आणि इतर बोर्ड वाचता येणार नाहीत आणि त्यामुळे इतर नागरिकांना मोठा धोका होवु शकतो.

या नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही
अशिक्षीत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स देवु नका असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांना ड्रायव्हिंग लायसन दिले तर ते धोकादायक ठरू शकते. रस्त्यावर चालणार्‍यांना त्यामुळे मोठे नुकसान होवु शकते. राजस्थान उच्च न्यायालयाने यासंदर्भात वाहतूक विभागाला आदेश देखील दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार एक गाइडलाइन तयार करून त्यानुसार वाचता आणि लिहीता येणार्‍या सक्षम नागरिकांनाच ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात यावे.