दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली, कॅप्टनसह 3 जवान शहीद

पोलीसनामा ऑनलाईन : दिवाळीच्या तोंडावर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी (major-infiltration-terrorists) सुरु झाली आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सीमारेषेजवळ सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये कॅप्टनसह तीन जवान (three-soldiers-martyrs-encounter) शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवादी मारले गेले आहेत.

 

शहीदांमध्ये दोन सैन्याचे आणि एक बीएसएफचा (BSF) जवान असल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने (ANI ) दिलेल्या माहितीनुसार कॉन्स्टेबल सुदीप सरकार हे माछिल सेक्टरमध्ये शहीद झाले. दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये भारतीय जवान प्राणांची बाजी लावत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे जवान आहेत. संयुक्त मोहिम सुरु असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.