सावधान ! गर्भनिरोधक गोळ्यांमुळे महिलांवर होत आहेत ‘हे’ 9 भयानक दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गर्भधारणा नको असल्यास अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या नियमित घेतात. बाजारात विविध कंपन्यांच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध असल्याने महिला अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्या घेतात. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होत असली तरी आरोग्यावर गंभीर दुष्परिणामही होऊ लागले आहेत. अनेक महिलांच्या यासंबंधीच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

हे आहेत दुष्परिणाम
१. मासिक पाळी अनियमित होण्याचे प्रकार वाढत आहेत.

२. चक्कर येणे, सतत उलट्या होणे अशाप्रकारचे त्रास होतात.

३. काही महिलांना थकवा, अशक्तपणा जाणवतो.

४. महिलांच्या लिबिडोमध्ये बदल झाल्याचेही आढळून आले आहे.

५. स्तनांमध्ये दुखणे, कडकपणा असा त्रासही होत आहे.

६. ०.७५ एम.जी.ची गर्भनिरोधक गोळी घेतल्यानंतर काही महिलांना थोडावेळ श्वास घेण्यास त्रास होतो.

७. ओठ, चेहरा, डोळ्यांच्या पापण्या, जीभ, हात आणि पाय सुजण्याची समस्याही काही महिलांना होते.

८. काही महिलांना पोटदुखीचा त्रासही होतो.

९. मासिक पाळीत जास्त ब्लीडिंग होते. फार त्रासही होतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like