छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा जवानांच्या बसवर हल्ला; 5 जवान शहीद,10 जखमी

रायपूर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी डीआरजीच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला स्फोटांनी उडवून दिले आहे. या हल्ल्यात 5 जवानांना वीरमरण आले असून 10 जवान जखमी झाले आहेत. जखमीपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवून ही बस उडवून दिली आहे.

नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. डीआरजीचे जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नारायणपूर येथे नक्षलवाद्यांनी त्यांच्या बसवर हल्ला चढवला. या हल्ल्याच्या घटनेला एसपी मोहित गर्ग यांनी दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलेल्या बसमधून डीआरजीचे 24 जवान प्रवास करत होते. स्फोटात 5 जवानांना जागेवरच वीरमरण आले. तर 10 जखमी झाले असून 5 जवानांची प्रकृती गंभीर आहे.