जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानासाठी ‘हेरगिरी’ करणारे 6 जणांना ‘आयबी’कडून अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्विसेज इंटेलिजेंस (आयएसआय) कडून जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी करत असलेले षडयंत्र रोखण्यात भारताला यश आले आहे. यात भारताने 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून राजकीय ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहिती आधिकाऱ्याने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये हे सहा गुप्तहेर आपल्या आका सोबत संपर्कात होते. या गुप्तहेरांचा सीमे पलीकडील दहशवादी समूह हिज्ब-उल-मुजाहिदीन बरोबर देखील संपर्क आहेत.

सगळ्यात आधी दोन गुप्तहेरांना मे महिन्यात जम्मूतील रत्नुचक सैन्य स्टेशन च्या बाहेर व्हिडिओ काढताना आणि फोटो काढताना अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी संवेदनशील सैन्य स्टेशनला निशाणा बनवण्याचा देखील प्रयत्न केला आहे आणि डिसेंबर महिन्यात एका चौकीवर तैनात एका शिपायावर गोळ्या चालवल्या होत्या.

चौकशी वेळी आरोपी डोडा जिल्हातील मुश्ताक अहमद मलिक आणि कठुआ जिल्ह्यातील नदीम अख्तर यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितले की त्यांना पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये देखील आका द्वारे निर्देशित केला जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की दोघे जम्मू क्षेत्रात पाकिस्तानचे गुप्तहेर म्हणून काम करत होते. त्यांनीच अन्य चार लोकांची देखील माहिती दिली जे पाकिस्तानचे गुप्तहेर म्हणून काम करत आहेत. त्यानंतर कारवाई करत या 4 जणांना देखील ताब्यात घेण्यात आले.