INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना CBI ने विचारले ‘हे’ प्रश्न !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – INX मीडिया प्रकरणी आरोप असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर सीबीआयकडून दोन तासांच्या दीर्घ नाटकीय घडामोडीनंतर काल रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री उशिरा त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी चौकशीत कोणतेही सहकार्य न करता एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने त्यांना इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांना किती वेळा भेटले होते ? असा प्रश्न विचारला. त्याचबरोबर तुम्ही त्यांना कसे काय ओळखता, त्याचबरोबर पैशाच्या व्यवहाराविषयी तुमच्याबरोबर त्यांचे काय बोलणे झाले असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर INX मीडिया प्रकरणी झालेल्या बैठकीत किती लोकांचा सहभाग होता असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्याचबरोबर त्यांचा मुलगा कार्ति याच्या समावेशाविषयी देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर सीबीआयने त्यांना त्यांच्या बँक खात्यांविषयी देखील माहिती विचारली असून तुमच्याकडे किती बँक खाती आहेत आणि कोणकोणत्या बँकात आहे हे देखील विचारण्यात आले.

विदेशात मालमत्ता घेण्यासाठी पैसे कुठून आले
यावेळी सीबीआयने त्यांना तुम्ही विदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले असा प्रश्नदेखील विचारला. त्यांच्याकडे चिदंमबरम यांच्या सर्व मालमत्तांची माहिती असून त्यांनी अनेक कायदे धाब्यावर बसवून निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात कुणाकुणाची भेट घेतली
त्याचबरोबर सीबीआयने त्यांना या प्रकरणात तुम्ही कुणाकुणाची भेट घेतली तसेच इंद्राणी हिची तुम्ही या प्रकरणात भेट घेतली होती यावर तुमचे काय स्पष्टीकरण आहे ? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्याचबरोबर हायकोर्टाने तुमचा जामीन रद्द केल्यानंतर तुम्ही कुठे गेला होतात तसेच तुमचा फोन का बंद होता असे देखील प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like