10 वी पास उमेदवारांसाठी सरकारची नोकरीची सुवर्णसंधी ! पश्चिम रेल्वेत मेगा भरती, 18000 रूपये पगार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही पदे आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची आहेत. दहावी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता व पदासांठी आवश्यकता आहे. 26 मे रोजी या पदासांठी मुलाखत होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये 65 वर्षीय वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत.

पदाचे नाव
सीएमपी-जीडीएमओ
पदाची संख्या -9
वयोमर्यादा – 53 वर्षे
सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट, अ‍ॅनेस्थेटिस्ट, फिजिशीअन, रेडिओलॉजिस्ट, इंटेन्सिविस्ट – 11 पदे भरण्यात येणार असून यासाठी वयोमर्यादा 53 वर्षे असणार आहे.

हॉस्पिटल अटेंडंट्स – 65 पदे (वयोमर्यादा 18-33 वर्षे)
हाऊस किपिंग असिस्टंट – 90 पदे (वयोमर्यादा 18 – 33 वर्षे)
एकूण 175 पदांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता
सीएमपी – जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक
सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अ‍ॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डिग्री/ डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी असणे आवश्यक आहे.

रेनल रिप्लेसमेंट/हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षाचा अनुभव (अर्जासोबत अनुभवाचा दाखल जोडणे आवश्यक आहे.)
हॉस्पिटल अटेंडंट्स – या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक असून रुग्णालयातील अनुभव असणे आवश्यक आहे.
हाऊस किपिंग असिस्टंट – या पदासाठी उमेदवार दहावी पास असणे आवश्यक असून अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वेतन
सीएमपी – जीडीएमओ – दरमहा 75 हजार रुपये
सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – दरमाहा 95 हाजार रुपये
रेनल रिप्लेसमेंट/हेमोडायलिसीस टेक्निशिअन – दरमहा 35 हजार रुपये अधिक भत्ते
हॉस्पिटल किपिंग असिस्टंट – दरमहा 18 हजार रुपये अधिक भत्ते
अर्ज कसा करायचा ?
इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. किंवा ekamikbct या गुगल प्ले वरील डाऊनलोडेबल अ‍ॅप्लिकेशनद्वारे अर्ज करायचा आहे.