पुणे गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ; पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी सुतोवाच केल्याप्रमाणे पुणे गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. गुन्हे शाखेची काही पथके बंद करण्यात आली आहेत.

गुन्हे शाखेमध्ये युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५ तसेच दरोडा प्रतिबंधक पथक, खंडणी विरोधी पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा विभाग, संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाची दोन पथके (गुंडा स्क्वाड), वाहन चोरी विरोधी पथक अशी तेरा पथके होती. गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर व्हावी या साठी आयुक्तांनी गुन्हे शाखेत महत्वाचे फेरबदल करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून सुरु केल्या होत्या. आठवड्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पुर्नरचनेचा प्रस्ताव मांडला होता.

या बैठकीत गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक पथक, होमिसाईड पथक, प्रॉपर्टी सेल, वाहन चोरी विरोधी पथक, संघटित गुन्हेगारी विरोधी पथक बरखास्त करुन पुर्नरचना करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त वेंकटेशम यांनी मांडला होता. बरखास्त करण्यात आलेल्या पथकातील पोलिसांना सध्या अस्तिवात असलेल्या युनिट १, युनिट २, युनिट ३, युनिट ४, युनिट ५,  खंडणी विरोधी पथक, भरोसा सेल या मध्ये सामावून घेतले आहे.

युनिटची कार्यालयेही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. युनिट १ चे कार्यालय पोलीस आयुक्तालयाच्या आवारात असून युनिट २ चे कार्यालय सोमवार पेठ पोलीस वसाहत, युनिट ३ चे कार्यालय पौड रोडवरील अंटी गुंडा स्कॉडच्या कार्यालयात, युनिट ४ चे कार्यालय खडकीतील रेंजहिल येथे, युनिट ५ चे कार्यालया मेगा सेंटरशेजारी असणार आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक पोलीस आयुक्त कार्यालयातच राहणार आहेत.

जी पथके बंद करण्यात आली. त्यातील पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना अन्य युनिटमध्ये सामावून घेण्यात आले असून त्यानुसार त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे (कंसात जुने ठिकाण) : राजेंद्र कदम (दरोडा विरोधी पथक) युनिट १, गजानन पवार (युनिट २) युनिट २, दिपक निकम (प्रॉपर्टी सेल) युनिट ३, अंजुम बागवान (ए ओ सी सी उत्तर) युनिट ४, दत्तात्रय चव्हाण (युनिट ५) युनिट ५, रघुनाथ जाधव (खंडणी विरोधी पथक) खंडणी विरोधी पथक, विजया कारंडे (महिला सहाय्य कक्ष) भरोसा सेल, स्वाती सुधीर थोरात (अमली पदार्थ विरोधी पथक) ज्येष्ठ नागरिक कक्ष, दीपक लगड (वाहनविरोधी पथक) प्रिव्हेन्टिव्ह बँच, गिता दोरगे (एम ओ बी) एम ओ बी, क्रांती पवार (प्रशासन, गुन्हे शाखा) प्रशासन, गुन्हे शाखा), वियज टिकोळे (युनिट २) तांत्रिक विश्लेषण, सुनिल दोरगे (अमली पदार्थ विरोधी पथक) अमली पदार्थ विरोधी पथक), मनिषा झेंडे (सामाजिक सुरक्षा) सामाजिक सुरक्षा.