अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण

पोलीसनामा ऑनलाईन, नांदगाव (जि.नाशिक), दि. 12 डिसेंबर अस्तगावचे लष्करी जवान मेजर सुरेश घुगे यांना वीरमरण आले असून जम्मू काश्मीरमध्ये देशसेवा करताना ते शहीद झाले आहेत.

जम्मू येथे रात्री नऊच्या वेळी डोंगरावर गस्त घालत असताना लष्करी जवान सुरेश घुगे यांचा पाय घसरुन कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून मेंदूला दुखापत झाली.

लष्करी इस्पितळात शर्थीचे वैद्यकिय उपचार झाले होते. मात्र, दुर्दैवाने यात त्यांना वीरमरण आले. खराब हवामानामुळे विमानाने त्यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत अधिकृतपणे निर्णय तेथील लष्करी अधिकारी घेणार आहेत.

याबाबतीत नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन माहिती कळविली.पंचक्रोषीतल्या नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी अस्तगावला त्यांच्या निवासस्थानी गर्दी केलीय.