डिजीटल हल्ल्यामुळे हादरले जग ! सर्वात मोठ्या हॅकिंगमध्ये सर्वसामान्यांचे झाले कोट्यवधींचे नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. यात अनेक अमेरिकन सेलिब्रिटींचे ट्विटर अकाउंट हॅक केले गेले आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, जगातील सर्वात श्रीमंत आणि गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांचा समावेश आहे.
खाते हॅक केल्यानंतर सर्व खात्यांमधून ट्विट करुन बिटकॉईन्सच्या रुपात पैसे मागितले जात होते. बिल गेट्स यांच्या ट्विटर अकाउंटवरून असे लिहिले गेले होते की, प्रत्येकजण मला सांगत आहे की आता समाजाला परत देण्याची वेळ आली आहे, तर मला असे म्हणायचे आहे की पुढच्या तीस मिनिटांत मला पाठवलेले पैसे मी दुप्पटीने परत करेल. तुम्ही १००० डॉलर्सचा बिटकॉइन पाठवा, मी २००० डॉलर परत पाठवेल. मात्र ही अडचण आता दूर झाली आहे.
ज्या प्रकारे रुपये आणि डॉलर आहेत, त्याच प्रकारे आता बिटकॉईन आहे. हे एक डिजिटल चलन आहे, जे फक्त डिजिटल बँकेत ठेवता येते. आता हे काही देशांमध्ये लागू केले गेले आहे आणि सर्वत्र एका बिटकॉइनची किंमत खूप जास्त आहे. गुंतवणूकीनुसार लोकांना ते खूपच आकर्षक वाटते. सध्या हे जगातील सर्वात महागडे चलन आहे. एका बिटकॉईनची किंमत ७ लाख रुपयांच्या जवळपास आहे.
लाखो लोकांना झाले कोट्यवधीचे नुकसान
सायबर सिक्युरिटीचे प्रमुख असलेले अल्पेरोविच म्हणतात की, सर्वसामान्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या हॅकिंग दरम्यान हॅकर्स सुमारे ३०० लोकांकडून १ लाख १० हजार डॉलर बिटकॉइन काढण्यात यशस्वी झाले आहेत.
डिजिटल हल्ला
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांच्यासह बऱ्याच दिग्गजांचे ट्विटर अकाउंट एकत्र हॅक करण्यात आले आहे. आणि प्रत्येकाच्या खात्यातून एकच ट्विट केले गेले की, तुम्ही बिटकॉइनद्वारे पैसे पाठवा आणि आम्ही तुम्हाला दुप्पट पैसे देऊ.