Makar Sankranti 2020 : 14 की 15 जानेवारी ? केव्हा असणार मकर संक्रांती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो. सूर्याच्या एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणे यास मकर संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीच्या उत्सवाला काही भागात उत्तरायण देखील संबोधतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान, व्रत, कथा, दानधर्म आणि सूर्यदेवाची पूजा करण्याला विशेष महत्व दिले जाते.

कधी आहे मकरसंक्रांती ?
ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, यावेळेस सूर्य मकर राशीत १४ जानेवारीला रात्री ०२:०७ वाजता प्रवेश करणार आहे. यामुळे मकरसंक्रांती १५ जानेवारीस साजरा करता येणार आहे. मकर संक्रांती पासून अग्नितत्वाची सुरुवात होते आणि कर्क संक्रांतीपासून जलतत्वाची सुरुवात होते. यावेळी सूर्य उत्तरायण होत असतो. यावेळी केलेले जप व दान यांचे फळ अनंत काळ टिकत असते.

ज्याप्रमाणे मकरसंक्रांतीचा सण देशभरात वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यातही विविधता आढळत असते. या दिवशी तिळाचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जातो. तीळ हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त माघ यात्रेत मोठ्या प्रमाणात साधू-संतांची गर्दी पाहायला मिळते. यावेळी दान धर्म करण्याची परंपरा लोक मोठ्या श्रद्धेने पूर्ण करत असतात.

कशी साजरी करावी मकरसंक्रांती ?

– पहाटे स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे

– श्रीमद् भगवदाचा अध्याय वाचावा किंवा गीता वाचावी

– नवीन कपडे, ब्लँकेट आणि तुपाचे दान करावे

– जेवणात नवीन पदार्थाची खिचडी बनवावी

– देवाला अन्न अर्पण करून प्रसाद म्हणून ते ग्रहण करावे

सूर्यापासून लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?

– लाल फुले आणि अक्षदा टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे

– सूर्याच्या बीज मंत्रांचा जप करावा

– या मंत्राचा जप करावा – “ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः”

– लाल कापड, तांब्याची भांडी आणि गहू इत्यादींचे दान करावे

– संध्याकाळच्या वेळी अन्न ग्रहण करू नये

मकरसंक्रांतीच्या सणाला तिळाचा वापर कसा करावा ?

– सूर्यदेवाला तिळाचे दाणे टाकून पाणी अर्पण करावे

– स्टील किंवा लोखंडी पात्रात तीळ भरून आपल्यासमोर ठेवावे

– नंतर “ॐ शं शनैश्चराय नमः” या मंत्राचा जप करावा

– एखाद्या गरिबास भांड्यासहित तिळाचे दान करावे

– यामुळे शनीशी संबंधित सर्व वेदनांपासून मुक्ती मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/