Makar Sankranti 2021 : या वर्षी शुभ योगात साजरी केली जाईल मकर संक्रांत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि परंपरा

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Makar Sankranti 2021 : वर्षातील पहिला सण मकर संक्रांत आहे. संक्रांतीपासून धनुर्मास समाप्त होतो. या दिवशी लोक गंगा-यमुनेच्या प्रवित्र पाण्यात स्नान करतात आणि दानधर्म करतात. या सणानंतर शुभ कार्यांना सुरूवात होते. संक्रांतीनंतर ग्रहांची दशा बदलते, ज्याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो, जो आपला शुभकाळ बनतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांना अर्ध्य दिले जाते. या वर्षाला योगानुसार शुभ मानले जात आहे, जे तुमच्या जीवनात सौभाग्य, समृद्धी आणि आनंद घेऊन येईल. परंतु, यासाठी तुम्हाला पूर्ण विधीपूर्वक पूजा आणि दानधर्म करावा लागेल.

जेव्हा सूर्य एका राशीतून दूसर्‍या राशीत प्रवेश करतो, तेव्ह त्यास संक्रांती म्हणतात. याचप्रमाणे, जेव्हा सूर्य धनुतून मकर राशीत प्रवेश करतो त्यास मकर संक्रांती म्हणतात. हिंदू कॅलेंडरमध्ये सूर्याच्या स्थितीच्या आधारावर एक वर्षात सहा महिन्याचे दोन भाग होतात. एक भाग उत्तरायण आणि दुसरा भाग दक्षिणायन असतो. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणमध्ये आहे, यासाठी या सणाला उत्तरायण सुद्धा म्हटले जाते. मकर संक्रांतीला दान आणि पवित्र स्नान इत्यादीचे खुप महत्व आहे. या दिवशी सूर्य देवतेला अर्ध्य देऊन त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद मागितला जातो.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

यावर्षीची मकर संक्रांती का आहे खास
14 जानेवारीला मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे. या दरम्यान सूर्य देव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. पंचांगानुसार मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्यास्तापर्यंत राहील. या शुभ मुहूर्ताच्या दरम्यान श्रद्धाळुंना पूजा, दान-पुण्य आणि पवित्र स्नान करावे लागेल. या वर्षी मकर संक्रांतीचे पर्व खास मानले जात आहे, कारण या वर्षी हे पर्व गुरुवारी येत आहे आणि सूर्यदेव गुरू मकर राशीतच विराजमान राहतील. यासाठी यास एक विशेष योग मानला जात आहे.

मकर संक्रांती 2021 ला करा ही शुभकार्य
या वर्षी मकर संक्रांतीला गरजूंना सहाय्य करा. सोबतच भगवान सूर्याला अर्ध्य देऊन त्यांच्या मंत्रांचे उच्चारण करा. सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करा. पवित्र नदीत स्नान करणे शक्य नसेल तर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. यानंतर विधीवत पूजा करा आणि उगवत्या सूर्याला तीनवेळा जल अर्पण करा.

मकर संक्रांती पूजाविधी आणि अनुष्ठान

1. सर्वप्रथम सकाळी उठून पवित्र स्नान करा.
2. स्वच्छ कपडे परिधान करा.
3. पाटावर लाल चंदनाने अष्टदल कमळ बनवा.
4. भगवान सूर्याचा फोटो ठेवा.
5. सूर्य मंत्रांचे उच्चारण करा. खाली दिलेल्या पाच मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा 11 वेळा जप करा.
ॐ घृणीं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मनोवांछित फलम देहि देहि स्वाहा
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
ॐ ह्रीं घृणींः सूर्य आदित्यः क्लीं ॐ
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
6. सूर्यदेवाला तिळ आणि गुळाचे लाडू अर्पण करा.
7. सूर्यदेवासह सर्व नऊ ग्रहांची पूजा करा.
8. यानंतर गरजूंना दान करा.
9. या सणाच्या दिवशी खिचडी खाणे सर्वात चांगला संकेत आहे.

या दिवशी लाखो भक्त गंगा आणि अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, नंतर दान करतात. असे म्हटले जाते की, मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णुने पृथ्वीवर राक्षसांचा वध केला होता. तेव्हापासून भगवान विष्णुंच्या या विजयाला संक्रांतीचा सण म्हणून साजरा केला जातो.