Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी भीष्म पितामह यांनी केला होता देह त्याग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Makar Sankranti 2022 । या वर्षी मकर संक्रात 14 जानेवारीला (Makar Sankranti 2022) आली आहे. या दिवशी सूर्य देव राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. जोतिष्याच्या मते सूर्याचे राशी परिवर्तन खूप अद्भुत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी, सूर्याच्या बदलाने खरमाची समाप्ती होईल. व वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागते. मकर संक्रांतीचा अद्भुत संबंध महाभारत काळापासून आहे. 58 दिवस बाणांच्या शय्येवर राहिल्यानंतर भीष्म पितामह यांनी आपला प्राण सोडण्यासाठी सूर्यास्त होण्याची वाट पाहिली होती. संपूर्ण कथा इथे वाचा.

 

हि आहे कथा
18 दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह 10 दिवस कौरवांच्या बाजूने लढले.
रणांगणात आजोबांचे युद्धकौशल्य पाहून पांडव व्याकुळ झाले.
नंतर पांडवांनी शिखंडीच्या मदतीने भीष्म पितामह वरती बाण सोडण्यास सांगितले, व अर्जुनाने एको पाठ एक अनेक बाण मारून त्यांना जमिनीवर कोसळवले.
भीष्म पितामह यांना इच्छामरणाचे वरदान असल्याने, अर्जुनाचे एवढे बाण लागून ही जिवंत होते.
भीष्म पितामह यांनी हस्तिनापूर चारी बाजूंनी सुरक्षित होईपर्यंत मरणार नाही, अशी शपथ घेतली होती, याबरोबरच त्यांनी सूर्यास्त होण्याची वाट पाहिली होती. कारण त्या दिवशी प्राण त्याग देणाऱ्याला मोक्ष प्राप्त होते.

भगवान श्री कृष्णांनी सांगितले मकर संक्रांतीचे महत्व
ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा (arvind mishra) यांनी सांगितले कि भगवान श्री कृष्णानीही सूर्यास्ताचे महत्व सांगितले आहे.
कि 6 महिन्याच्या शुभ मुहूर्त सूर्यास्त होताना धरती प्रकाशमय होते. त्यावेळीस जो मरण पावतो त्याचा पुनर्जन्म होत नाही.
असे लोक थेट ब्राम्ह प्राप्ती करतात. म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होते.
यामुळेच भीष्म पितामहांनी जीव सोडण्यासाठी सूर्यास्त होण्याची वाट पहिली होती.

 

मकर संक्रांत शुभ मुहूर्त (Makar Sankranti Shubh Muhurat)
ज्योतिषाचार्य डॉ. अरविंद मिश्रा यांनी सांगितले कि मुहूर्त चिंतामणी ग्रंथानुसार मकर संक्रातीचा शुभ मुहूर्त (Makar Sankranti 2022) सूर्यास्ताच्या 16 तास आधी आणि 16 तास नंतर होते.
या वेळेस शुभ मुहूर्त 14 जानेवारीला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरु होईल व 5 वाजून 44 मिनिटांपर्यंत राहील. या कालावधीत स्नान, दान, जप करू शकता तसेच , तुम्ही स्थिर विवाहाचा विचार करत असाल तर त्याचा महाशुभ मुहूर्त 9 वाजून 10.30 मिनिटांपर्यंत राहील.
यानंतर मुहूर्त दुपारी 1.32 ते 3.28 पर्यंत असेल.

 

Web Title :-  Makar Sankranti 2022 | makar sankranti 2022 date know mythological significance of makar sankranti and connection with mahabharata

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Weather | उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले; नाशिक, निफाडमध्ये हंगामातील निचांकी किमान तापमानाची नोंद

 

SSY | ‘या’ सरकारी योजनेत अवघ्या 400 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवू शकता जवळपास 65 लाखाची रक्कम, जाणून घ्या नियम आणि अटी

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !