Makar Sankranti 2022 | सूर्य-शनि समोरा-समोर आल्याने अशुभ योग निर्माण होणार; 12 राशींवर होणार ‘हा’ परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Makar Sankranti 2022 | काही दिवसातंच म्हणजे 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती (Makar Sankranti 2022) सण जवळ आला आहे. या दिवशी सुर्य मकर राशीतून (Capricorn) शनीच्या राशीत (Shani) प्रवेश करण्याची शक्यता आहे. महिनाभर सुर्य या स्थितीमध्ये राहणार आहे. अशा स्थितीमध्ये या दिवसापासून खरमास संपल्यानंतर सर्व शुभ कार्य सुरू होतात. तर 29 वर्षांनंतर यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य आणि शनी (Sun And Shani) परस्पर आमने-सामने येणार आहेत. याचा मात्र 12 राशींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मग काय होईल परिणाम.

 

1. मेष (Aries) :
या राशीच्या लोकांचे नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंध बिघडू शकतात. तसेच वैवाहिक जीवनात देखील अडचणी येऊ शकतात, करिअरमध्येही चढ-उतार निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

2. वृषभ (Taurus) :
या राशीच्या लोकांचे करिअर खूप चांगले असणार आहे. चांगली सहल होण्याची शक्यता आहे. वडिलांशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागणार आहे.

 

3. मिथुन (Gemini) :
या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या भ्रमणात तुम्हाला आरोग्याची चिंता लागू शकते. वडिलांच्या संपत्तीतून लाभ होईल.

4. कर्क (Cancer) :
या राशीच्या लोकांना प्रेम संबंधात अडचणी येऊ शकतात. जीवनसाथी सोबतचा ताळमेळ बिघडू शकतो. यामुळे अशांतता जाणवू शकते, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. (Makar Sankranti 2022)

 

5. सिंह (Leo) :
या राशीच्या लोकांसाठी चांगली संधी आहे, त्यांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. म्हणजेच करिअरमध्ये वाढ होईल. दैनंदिन जीवनात सुधारणा होईल. रोज व्यायाम करणे फायदेशीर ठरणार आहे.

 

6. कन्या (Virgo) :
या राशीतील लोकांनी शेअर बाजार इत्यादी पासून अंतर ठेवा. कुटुंब आणि मुलांच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत राहू शकता, प्रेम जीवन चांगले राहिल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

 

7. तूळ (Libra) :
या राशीतील लोकांना वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात, पण रवि-संक्रमण संपल्यानंतर परिस्थिती सुधारेल. करिअरमध्ये काही बदल होतील.

 

8. वृश्चिक (Scorpio) :
या राशीच्या लोकांना प्रवास करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या नातेवाईकाशी संबंध बिघडू शकतात. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतो.

 

9. धनु (Sagittarius) :
या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होईल. तब्येतीची काळजी घ्या. काही प्रकारची शारीरिक समस्या असू शकते. नोकरीत अनावश्यक गोष्टी टाळा.

10. मकर (Capricorn) :
या राशीच्या लोकांना नोकरीत खास भागीदार तुम्हाला त्रास देतील. वैयक्तिक जीवनात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विचार न करता व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा.

 

11. कुंभ (Aquarius)-
या राशीच्या लोकांना झोपेच्या समस्या तुम्हाला त्रास देतील. नोकरदारांमध्ये वाढ होईल.
डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देईल, तुमचा कल धर्माकडे असेल.

 

12. मीन (Pisces) :
या राशीच्या लोकांसाठी प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ होतो.
कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

 

टीप :- वरील माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे. वरील लेखावरून आम्ही (www.policenama.com) कुठलाही दावा करत नाही.

 

Web Title :- Makar Sankranti 2022 | surrya aur shani will face after 29 years these zodiac signs will benefit know more about this know more

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | बनावट फेसबुक अकाऊंटवर महिलेची बदनामी अन् आत्महत्येची धमकी; बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास

 

Vodafone-Idea | BSNL ला विक्री करणारे सरकार व्होडाफोन आयडियाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनेल, टाटा टेलीमध्येही पार्टनर

 

Pune Crime | पुण्यात टिळक रस्त्यावर भरदिवसा तरुणीसमोर ‘हस्तमैथून’ करणारा CCTV त कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु