डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शनिवार पेठ येथील मातृमंदिर संस्कार केंद्र 2 शाळेमध्ये मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या सणाला काळ्या रंगाचे महत्व असल्यामुळे सर्व बालचमू काळ्या रंगाचे पोशाख व हलव्याचे दागिने घालून आले होते.

हेही वाचा – ‘एनईएमएस’मध्ये घरकारमगार दिन साजरा

यावेळी शिक्षिकांनी मुलांना मकर संक्रांत सणाची माहिती दिली. तसेच मुलांसाठी बोरन्हाण समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. शिक्षिकांनी मुलांच्या मातांना सुवासिनीचे वाण देऊन तिळ गूळ घ्या, गोड बोला असे म्हणत शुभेच्छा ही दिल्या.

हेही वाचा – पुण्यातील न्यू इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये (NEMS) ‘बालदिन’ उत्साहात साजरा !

पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषा सुर्यवंशी, मृणाल पवार, दिपा केळकर व अपर्णा हेंद्रे या शिक्षिकांनी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केले.

फेसबुक पेज लाईक करा –