Makarand Anaspure | लवकरच अभिनेते मकरंद अनासपुरे दिसणार धोट्या पडद्यावरील ‘या’ मालिकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या विनोदी असो अथवा गंभीर अभिनयातून अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी आजपर्यंत चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे अनेक चाहते वर्ग आहेत त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जाते. मागील काही वर्ष ते केवळ चित्रपटातच काम करत होते मात्र आता बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा ते छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. (Makarand Anaspure)

 

मकरंद यांच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. मकरंद अनासपुरे आता ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. दिनकर त्र्यंबक गुळस्कर असे त्या व्यक्तीरेखेचे नाव आहे. जो पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेली सतरा वर्ष कार्यरत असल्याचे दाखवण्यात येणार आहे. सध्या पोस्ट ऑफिस उघड आहे या मालिकेची चर्चा जोरात सुरू आहे. तर या मालिकेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार मंडळी दिसणार असल्याने चाहते या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे हे कलाकार दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/CWbNDDTtdqt/?utm_source=ig_embed&ig_rid=59091e96-b1d2-4b0f-89c8-d84d78bed81c

या मालिकेबद्दल बोलताना मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) म्हणाले, “मला खूप आनंद होत आहे.
गेल्या अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मी छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी सज्ज झालो आहे.
मी आजवर अनेक धाटणीचे कार्यक्रम केले आहेत मात्र काल्पनिक कथा असलेल्या मालिकेत काम केलं नव्हतं जे आज या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. सगळ्यात जास्त आनंदाची बातमी म्हणजे या मालिकेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकार देखील सहभागी आहेत त्यांच्याबरोबर अनेक तरुण कलाकार माझ्यासोबत असणार आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा आणि विलक्षण असणार आहे”. ही मालिका 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title :- Makarand Anaspure | makarand anaspure will be playing prominent role in post office ughada aahe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | खडकीसह सहा कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा; आमदार शिरोळे यांची मागणी

Nana Patole | महाराष्ट्र सरकारनेही राज्यात जातनिहाय जनगणना करावी – नाना पटोले

Ambadas Danve | विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मांडली भूमिका